ऑस्ट्रेलिया विरूद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता भारताला (3 जानेवारी) पासून सिडनीमध्ये मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला सिडनी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. पण हा कसोटी सामना अनिर्णित राहिला तर समीकरण काय असेल? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, भारतीय संघाला सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. हा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. भारत ऑस्ट्रेलियाविरूद्धची पाचवी कसोटी हरेल किंवा ड्रॉ करेल, दोन्ही बाबतीत भारतीय संघाचा प्रवास संपणार आहे.
सिडनीत खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेवर लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे केवळ सिडनी कसोटी जिंकणे पुरेसे ठरणार नाही. प्रथम, भारताने सिडनी कसोटी जिंकली पाहिजे आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने 2-0 किंवा 1-0 असा विजय मिळवावा लागेल. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत एकही कसोटी सामना जिंकला, तर ते WTC फायनलसाठी पात्र ठरतील आणि भारत बाहेर होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जसप्रीत बुमराह नसता तर बीजीटी एकतर्फी…’, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा दावा
IND vs AUS; स्टीव्ह स्मिथने यशस्वी जयस्वालवर केला आरोप, म्हणाला…
जसप्रीत बुमराह सिडनीत इतिहास रचणार? हरभजन सिंगचा हा महान विक्रम मोडण्याची शक्यता