यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 30वा सामना अमेरिका विरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) यांच्यामध्ये शुक्रवारी फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या संघाला आयर्लंडविरुद्ध विजय मिळवून सुपर-8 साठी पात्र ठरण्याची संधी आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचीही या सामन्यावर नजर असेल.
कारण जर अमेरिका हा सामना हरला आणि पाकिस्तान संघानं आयर्लंडविरुद्धचा शेवटचा साखळीफेरी सामना जिंकला तर ते सुपर 8 साठी पात्र ठरतील. दुसरीकडे, आयर्लंड संघानं सुरुवातीचं दोन्ही सामने गमावलं आहेत. या सामन्यावर पावसाटं सावट होतं. परंतु आता तेथील वातावरण स्वच्छ झालं आहे. अमेरिका विरुद्ध आयर्लंड हा सामना कमीत-कमी 5 षटकांचा सामना खेळवण्याची तयारी सुरु आहे.
फ्लोरिडामध्ये अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. परंतु, सामन्यापूर्वी पाऊस पडला असून आउटफील्ड ओलं आहे, त्यामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मैदानाच्या सभोवतालचं हवामान स्वच्छ झालं आहे. परंतु नंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चांगली गोष्ट ही आहे की, 10.45 वाजण्याच्या सुमारास पंच मैदानाची पाहणी करतील, त्यानंतर नाणेफेकीचा निर्णय घेतला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आझम खानच्या फिटनेसबद्दल, पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं केला मोठा खुलासा!
“आम्ही कोणत्याही संघाचा…” सुपर 8 साठी पात्र ठरल्यानंतर अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया
सुपर-8 मध्ये तीन जागांसाठी सात संघात रस्सीखेच! इंग्लंड-पाक नशिबावर अवलंबून