---Advertisement---

विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खूप खास, जाणून घ्या ‘वामिका’ या नावाचा अर्थ

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 9:45 AM
---Advertisement---

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. या लोकप्रिय जोडप्यांना ११ जानेवारी २०२१ ला कन्यारत्न प्राप्त झाले होते. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहितीसुद्धा आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. विराट आणि अनुष्का यांची मुलगी दिसायला कशी असेल? तिचं नाव काय असेल? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतानाच या दोघांनीही नुकताच त्यांच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर करत तिच्या नावाचा खुलासादेखील केला आहे.

अनुष्का आणि विराट यांनी आपल्या लेकीचे नाव काय ठेवावे? यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक पर्याय सुचवले होते. अनुष्काने ज्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता त्या ठिकाणी नोंदणी अर्जावर बाळाचे नाव अन्वी ठेवण्यात आल्याचे बोलले जात असल्याने या नावाची चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु या चर्चेला पूर्णविराम देत त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. त्यामुळे आता सर्वांना या नावाचा काय अर्थ आहे? याबद्दल उत्सुकता लागली आहे.

वामिका नावाचा अर्थ –

वामिका या नावाचा अर्थ ‘दुर्गा’ असा आहे. हे दुर्गा देवीचा एक नाव असून देवी दुर्गेच स्वरूप असल्याचे म्हटल जात आहे. भगवान शंकर यांच्या डाव्या बाजूला जी स्त्री उभी राहते, ती वामिका आहे. हिंदू संस्कृतीत प्रत्येक पुरुषाच्या डाव्या बाजूला नेहमी त्याची पत्नी उभा राहते. त्यामुळे वामिका ही शंकर देवाची पत्नी अर्थात दुर्गा माता आहे.

विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो व्हायरल 

अनुष्का शर्माने आपल्या मुलीचे पहिले छायाचित्र तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. हा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की काही मिनिटातच या फोटोला सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. विरुष्का चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रियाही दिल्या आणि वामिकाला खूप प्रेम आणि आशीर्वादसुद्धा दिले.

अनुष्काने फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले होते की, “आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो, पण या छोट्या वामिकाने याला नवीन स्तरावर नेले. अश्रू, हास्य, चिंता, आनंद या सर्व अशा भावना आहेत, ज्या आम्ही एका क्षणात अनुभवल्या आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.”

https://www.instagram.com/p/CKvOEpOpEG_/?utm_source=ig_web_button_share_sheet

विराटने सोशल मीडियाद्वारे दिली होती माहिती –

११ जानेवारीला अनुष्काला मुलगी झाली होती. त्यादिवशी विराट कोहलीने आपल्या सोशल मीडियावर देखील बाबा झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. वडील झाल्यानंतर आनंदाची बातमी सांगताना विराट कोहलीने सांगितले होते की, “हे सांगताना आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत”

मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली सुट्टीवर होता. पण तो आता क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी तो चेन्नईला गेला आहे. ५ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट-अनुष्काच्या लाडक्या लेकीचे नाव ठरलं! बाळासह फोटो पोस्ट करत दिली माहिती

नांदेडकरांना लाभणार रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीचे मार्गदर्शन, लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी 

सानिया मिर्झाने स्पेशल पोस्ट शेअर करत पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली… 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---