गोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल २०१८ स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकत पदकाचे खाते उघडले आहे. वेट लिफ्टर पी. गुरुराजाने ५६ किलो वजनी गटामध्ये ही रौप्य पदकाची कमाई केली.
२८ वर्षीय गुरू राजाने २४९ किलोचं वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिले. सुरूवातीला गुरूराजाने क्लिन १११ किलो वजन तर नंतर १३८ किलो वजन उचलत ही कामगिरी केली.
मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी २६१ किलो वजन उचलत सुवर्ण तर श्रीलंकेकच्या चतुरंगा लकमलने २४८ किलो वजन उचलत कास्य पदकाला गवसणी घातली.
The mighty GURURAJA comes in 2nd winning #TeamIndia its first 🥈 #Medal at the @GC2018 lifting total weight of 249kg in the Men's 56kg event! #Congratulations #TeamMalaysia & #TeamSriLanka @WeightliftingIN @Media_SAI pic.twitter.com/qgH7Aam0ls
— Team India (@WeAreTeamIndia) April 5, 2018
काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला क्वीन्सलॅण्डमधील गोल्ड कोस्ट येथे दिमाखात सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अभूतपूर्व होता. या सोहळ्यात पीव्ही सिंधूने भारताची ध्वजवाहक म्हणून जबाबदारी पार पाडली. आता पुढील ११ दिवस ७१ देशांचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.