भारतीय संघाला नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात अपयश मिळाले. उपांत्या सामन्यात इंग्लंडकडून तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर संघ आणि संघ व्यवस्थापन टीकाकारांच्या निशाण्यावर आले. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने राष्ट्रीय संघाची निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. अशात आता काही नावे समोर येताना दिसतात, जी भारताच्या नवीन निवड समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त होण्याची दाट शक्यता आहे.
एल शिवराकृष्णन (L Sivarakrishnan), नयन मोंगिया (Nayan Mongia), मनिंदर सिंग (Maninder Singh), हेमांग बदानी (Hemang Badani), शिव सुंदर दास (Shiv Sunder Das) आणि अजय रात्रा (Ajay Ratra) यांची नावे सध्या चर्चेत आहेत. चेतन शर्मां (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त होणार असल्यामुळे या सर्वांची नावे नवीन निवड समितीसाठी निवडली जाऊ शकतात. या काहीच्या व्यतिरिक्त अजून अनेकांनी निवड समितीचा सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे, पण स्पर्धेत हीच सहा प्रमुख नावे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने निवड समितीमध्ये सहभागी होऊ इच्छिनाऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले होते. सोमवारी (28 नोव्हेंबर) हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होता.
नवीन निवड समिती नियुक्त केली जाईपर्यंत चेतन शर्मा आणि त्यांचे सहकारी निवडकर्त्यांच्या रूपात त्यांचे काम सुरू ठेवणार आहेत. पण नवीन समिती निवडली गेल्यानंतर मात्र त्यांना हे काम थांबवावे लागेल. सध्या चेतन शर्मा आणि त्यांचे सहकारी विजय हजारे ट्रॉफी, तसेच कूच बिहार ट्रॉफीवर नजर ठेवून आहेत. भारतीय संघाला 2023च्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील मालिका केळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी संघाच्या नवीन निवड समितीकडे असेल, असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयने निवड समितासाठी मागवलेल्या अर्जांसाठी काही अटी लागू केल्या गेल्या होत्या. त्या अटी म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवार भारतासाठी कमीत कमी सात कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळला असावा. असे नसेल, तर 20 प्रथम श्रेणी सामने आणि भारतासाठी 10 एकदिवसीय सामने खेळणारा उमेदवार देखील अर्ज करू शकत होता. अर्जदारासाठी वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली गेली होती आणि उमेदवार मागच्या किमान पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला असावा. (The names of these six people are being discussed for the new selection committee of India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत मझहर ताहेरभॉय याला विजेतेपद
‘या’ गोलंदाजासोबत खेळण्याचा मला फायदाच, अर्शदीप सिंगने सांगितले चकित करणारे नाव





