बांगलादेश वनडे संघाचा नवनियुक्त कर्णधार तमीम इकबाल खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘टीम कल्चर’मध्ये बदल करण्याच्या विचार करत आहे. पाच वर्षे कर्णधारपद सांभाळल्यानंतर राजीनामा देणाऱ्या मश्रफे मोर्तझाची जागा घेणाऱ्या तमीमचा असा विश्वास आहे की, चांगली शिस्त व एकत्रित प्रयत्नांमुळे बांगलादेश नवी उंची गाठू शकेल.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) तमीमला (Tamim Iqbal) कर्णधार बनण्यासाठी तयार केले आहे. परंतु तो दीर्घकाळ कर्णधारपद सांभाळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) पुनरागमनानंतर याबाबतीत सर्वकाही स्पष्ट होईल. कारण शाकिब सर्व क्रिकेट प्रकारासाठी कर्णधार म्हणून बांगलादेशची पहिली पसंती राहिला आहे. शाकिबला 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशचा वनडेे कर्णधार तमीम म्हणाला की, “मला सुधारण्यासाठी छोटी-छोटी पावले उचलावी लागतील. जेणेकरून आमच्या सरावात कसा सुधार होईल, एक संघ म्हणून आम्ही आणखी चांगले कसे खेळू शकतो आणि इतरांच्या विकासात कशाप्रकारे मदत करू शकतो, इत्यादी गोष्टी पहाव्या लागतील.”
“मी इथूनच सुरुवात करेल. खरंतर, आम्हाला टीम कल्चरच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जेणेकरून प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम खेळ दाखवेल. आम्ही मैदानाच्या आत आणि बाहेर व्यावसायिकांसारखे वागावे अशी माझी इच्छा आहे,” असेही तमीम यावेळी म्हणाला.
बांगलादेश संघ आपला पुढचा वनडे सामना 1 एप्रिलला पाकिस्तान विरुद्ध कराचीमध्ये खेळणार आहे. यानंतर बांगलादेशचा संघ मेमध्ये आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
– “तूला आता आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल”
– टेक महिंद्रा, सीबीएसएल संघांचे विजय
– अखेर कॅप्टन कूल एमएस धोनीने चेन्नई सोडलीच