2024चे ऑलिम्पिक नुकतेच संपले. त्याचे आयोजन पॅरिसनं केलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेनं सर्वाधिक 126 पदकं जिंकली. भारतीय खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकचे यश पाहून आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की पुढील ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? या बातमीद्वारे आपण सर्व माहिती जाणून घेऊया.
जेव्हापासून ऑलिम्पिक भरवले जात आहे तेव्हापासून ऑलिम्पिकची ही 33वी स्पर्धा पॅरिसमध्ये खेळली गेली. आता ऑलिम्पिकची पुढील स्पर्धा 2028 मध्ये खेळवली जाईल. पुढील ऑलिम्पिक आतापासून 4 वर्षांनी म्हणजे 2028 मध्ये होणार आहे. 2028 मध्ये ऑलिम्पिक खेळ अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळवले जाणार आहेत. पुढच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच 2028 मध्ये क्रिकेटचाही समावेश केला जाणार आहे. यापूर्वी 1900च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट पाहायला मिळालं होतं. क्रिकेट प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 6 पदकं जिंकली. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले आणि केवळ एका स्थानानं पदक हुकलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदकांच्या बाबतीत दुहेरी आकडा पार करतील अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र भारताला केवळ 6 पदकंच जिंकता आली. त्यामध्ये भारतीय खेळाडू ऍथलेटिक्समध्ये 1, नेमबाजीत 3, हाॅकी 1 आणि कुस्तीमध्ये 1 पदक मिळवण्यात यशस्वी राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्राॅफी? दिग्गज खेळाडूनं सांगितलं मोठं कारण
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कोण जिंकेल भारत की ऑस्ट्रेलिया? दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी
बोली लागल्यास ‘विराट कोहली 30 कोटींहून’ अधिक रुपयांना विकला जाईल, आयपीएल लिलावकर्त्याचा मोठा दावा