आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) पूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. आगामी मेगा लिलावापूर्वी अनेक नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पण मेगा लिलावापूर्वी एक संघ 4 पेक्षा जास्त खेळाडूंना कायम ठेवू शकेल का? आता हा नियम जाहीर होण्याची तारीख समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, (31 ऑगस्ट) रोजी रिटेन्शन नियम जाहीर केले जातील. परंतु, आता त्याची तारीख पुढे जाणार असल्याचे दिसत आहे. ईएसपीएनच्या रिपोर्ट्सनुसार, आता सप्टेंबरच्या सुरुवातीला या नियमांची घोषणा केली जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
2022च्या आयपीएलपूर्वी (IPL) झालेल्या मेगा लिलावात (Mega Auction) संघांना 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता भारतीय नियामक मंडळ (BCCI) यावेळी नियमांमध्ये काय बदल करते आणि किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आगामी आयपीएलपूर्वी अनेक स्टार खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत, तर अनेक खेळाडू त्यांच्या जुन्या संघात जाताना दिसतील. त्यामुळे येणारा आयपीएलचा 18वा हंगाम खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे. शेवटच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली आणि युवा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली केकेआरनं धमाकेदार कामगिरी करत हैदराबादचा फायनलमध्ये पराभव केला आणि शानदार विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
संघात सर्वात खोटारडा कोण? दिग्गज खेळाडूनं केला खुलासा
जय शाह यांचं एका महिन्याचं वेतन किती? बीसीसीआयमध्ये किती कमाई होत होती?
“40 टक्के सामने खेळले नाहीत आणि आराम…” रोहित-विराटबद्दल माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य