यावर्षी भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. मंगळवारी (27 जून) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाला सुरुवात होईल. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. तत्पूर्वी सोमवारी (26 जून) अशी माहिती समोर आली की, आयसीसी वनडे विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण अंतराळात करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी माहिती दिली गेली आहे.
जय शहा (Jay Shah) यांच्या सोशल मीडियावर वनडे विश्वचषकाची ट्रॉफी अंतराळात पोहोचवल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. एकाद्या क्रीडा स्पर्धेची ट्रॉफी पहिल्यांदाच अंतराळापर्यंत पोहोचली आहे, अशी माहितीही जय शहांकडून दिली गेली. पृथ्वीपासून 1 लाख 20 हजार किलोमीटर लांब अंतराळात आगामी वनडे विश्वचषकाच्या ट्रॉपीचे अनावरण केले गेले. त्याठिकाणी -65 डिग्री सेलसिअस एवढे तापमान होते. स्पेसमधून आल्यानंतर ट्रॉफीला अहमदापादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरवल्याचेही सांगितले जात आहे.
“क्रिकेट जगतासाठी हा अनोखा दिवस आहे. विश्वचषका ट्रॉफीचे अनावरण अंतराळात केले गेले आहे. ही अंतराळात पाठवली गेलेली पहिली ट्रॉफी आहे. खऱ्या अर्थाने आयसीसी पुरुष विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या प्रवासाची सुरुवात अतिशय चांगली झाली,” असे कॅप्शन जय शहांनी आपल्या पोस्टला दिले आहे.
An out-of-this-world moment for the cricketing world as the #CWC23 trophy unveiled in space. Marks a milestone of being one of the first official sporting trophies to be sent to space. Indeed a galactic start for the ICC Men's Cricket World Cup Trophy Tour in India. @BCCI @ICC… pic.twitter.com/wNZU6ByRI5
— Jay Shah (@JayShah) June 26, 2023
दरम्यान 27 जूनपासून या आयसीसी वनडे विश्वचषक ट्रॉपीचा जगप्रवास सुरू होणार आहे. यात कुवेत, मलेशिया, अमेरिका, नाइजीरिया, युगांडा, फ्रांस, इटली, यूएसए आणि यजमान भारत या देशांचा समावेश आहे. एकूण 18 देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवली जाणार आहे. (The ODI World Cup 2023 trophy was unveiled at Space)
विश्वचषक ट्रॉफीच्या प्रावासाचे वेळापत्रक
27 जून – 14 जुलै – भारत
15 – 16 जुलै – न्यूझीलंड
17-18 जुलै: ऑस्ट्रेलिया
19-21 जुलै: पापुआ न्यू गिनी
22-24 जुलै: भारत
25-27 जुलै: यूएसए
28-30 जुलै: वेस्ट इंडीज
31 जुलै- 4 ऑगस्ट: पाकिस्तान
5-6 ऑगस्ट: श्रीलंका
7-9 ऑगस्ट: बांगलादेश
10-11 ऑगस्ट: कुवेत
12-13 ऑगस्ट: बहरिन
14-15 ऑगस्ट: भारत
16-18 ऑगस्ट: इटली
19-20 ऑगस्ट: फ्रांस
21-24 ऑगस्ट: इंग्लंड
25 – 26 ऑगस्ट: मलेशिया
27-26 ऑगस्ट: युगांडा
29-30 ऑगस्ट: नाइजीरिया
31 ऑगस्ट – 3 सप्टेंबर: दक्षिण आफ्रिका
4 सप्टेंबरनंतर: भारत
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: सपना गिल प्रकरणात पृथ्वीला क्लीनचीट! मुंबई पोलिसांचा जबाब ठरला निर्णायक
ASHES 2023 । दुसऱ्या कसोटीतून मोईन अलीचा पत्ता कट! ‘या’ इंग्लिश गोलंदाजाला मिळाले संघात स्थान