जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चे विजेतेपद ऑस्ट्रेलियन संघाने पटकावले. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना बुधवारी (7 जून) लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू झाला आणि रविवारी (11 जून) हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. भारताला 209 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिय पुन्हा एकदा आयसीसीच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि भारताला आयसीसी ट्रॉफीचा दुष्का अजूनच लांबला. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलियन पुरुष सांघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आतापर्यंत एकूण 9 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. रविवारी ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनला. सोबतच कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins), डेविड वॉर्नर (David Warner), स्टीव स्मिथ (Steve Smith), मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि जोश हेजलवूड (Josh Hazlewood) यांनी देखील मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली. जागतिक क्रिकेटमध्ये आयसीसी वनडे विश्वचषक, आयसीसी टी-20 विश्वचषक आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा या तीन ट्रॉफी जिंकणारे हे केवळ पाचच खेळाडू आहेत. विशेष म्हणजे हे पाचही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे असल्यामुळे त्यांच्या संघासाठी नक्कीच ही अभिमानाची बाब म्हणता येईल.
वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि डब्ल्यूटीसी जिंकणारे खेळाडू
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया)
All-format superstars ????
The only five players to have won ICC @cricketworldcup, @T20WorldCup, and World Test Championship titles ????✨#WTC23 pic.twitter.com/baeTQNw4KJ
— ICC (@ICC) June 12, 2023
दरम्यान, जोश हेजलवूड डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रत्यक्षात खेळतना दिसला नाही, पण संघ व्यपस्थापनाने त्याला या सामन्यासाठी ताफ्यात सामील केले होते. नंतर दुखापतीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले गेले नाही. उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारतीय संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. शेवटच्या डावात भारताने सर्व विकेट्स 234 धावांवर गमावल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469, तर भारताने 296 धावा केल्या होत्या. (The only five players to have won ICC ODI worldcup, T20WorldCup & WTC titles)
महत्वाच्या बातम्या –
बाबरला पछाडत ‘हा’ युवा ठरला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ, महिला विभागात ‘ही’ ठरली सर्वोत्तम
‘भारतीय फलंदाजांना बाबर आझमकडून शिकण्याची गरज…’, पराभवानंतर माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान