अबू धाबी टी10 लीगचा आता शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत डेक्कन ग्लॅडिएटर्स आणि टीम अबू धाबी यांच्यातील बाद फेरीचा सामना शनिवारी (दि. 3 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात ग्लॅडिएटर्सने टीम अबू धाबीला 5 धावांनी पराभूत केले. या रोमांचक सामन्यात एक मजेशीर घटना बघायला मिळाली, ज्यामुळे सर्वत्र हशा पिकला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात अबुधाबी संघाचा कर्णधार ख्रिस लिन (Chris Lynn) आणि ऍलेक्स हेल्स (Alex Hales) यांच्यात स्ट्राईक घेण्यावरुन चढाओढ बघायला मिळाली. दोन्ही सलामीवीरांना स्ट्राईक घ्यायची होती, पण त्यांच्यापैकी कोणीही पिछेहाट करण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा दोघांनी एका मजेशीर खेळाने याचा तोडगा काढण्याचे ठरवले. मैदानावरच त्यांनी रॉक-पेपर-सिझर खेळत स्ट्राईक कोण घेणार याचा निर्णय घेतला. या मजेशीर खेळात संघाचा कर्णधार जिंकला आणि त्याने स्ट्राईक घेतली. या घटनेच्या व्हिडीओला सोशल मिडीयावर देखील चांगलीच दाद मिळत आहे. मात्र, या सामन्यात दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. लिन 5 चेंडूत 13 धावा करत बाद झाला आणि तुफानी फलंदाज ऍलेक्स हेल्स अवघ्या 1 धावेवर बाद झाला.
— Hassam (@Nasha_e_cricket) December 3, 2022
डेक्कन ग्लॅडिएटर्सने मिळवला धमाकेदार विजय
या सामन्यात डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत निर्धारित 10 षटकात 6 गडी गमावत 94 धावा केल्या. या डावात ओडियन स्मिथ याने 15 चेंडूत 32 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम अबू धाबी संघ निर्धारित 10 षटकात 8 गडी गमावत 89 धावा केल्या.
या स्पर्धेचा अंतिम सामना न्यूयॉर्क स्ट्राईकर्स आणि डेक्कन ग्लॅडिएटर्स या संघात शनिवारी (दि. 4 डिसेंबर) खेळला जाईल. तसेच अंतिम सामन्याच्या आधी तिसऱ्या जागेसाठी मॉरिसविले सॅंप आर्मी आणि टीम अबुधाबी या संघात सामना खेळला जाईल.(The openers of Team Abu Dhabi played Rock Paper Scissors to decide who will take strike)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेरच्या जोडीने टीम इंडियाला लोळवलं! भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध मानहानीकारक पराभव
‘हिंमत असेल तर जिंकूनच दाखवा’; स्टोक्सचे पाकिस्तान संघाला पाकिस्तानातच खुले आव्हान






