जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाने 8 बाद 270 धावांवर डाव घोषित केला होता. यानंतर भारतीय संघाकडून दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी शुबमन गिल आणि रोहित शर्मा खेळपट्टीवर आले. यावेळी दोघांनीही पहिल्या षटकापासून फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, आठव्या षटकादरम्यान भारताला गिलच्या रूपात मोठा झटका बसला. तिसऱ्या पंचांनी गिलला बाद देताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाही, तर मैदानातील चाहतेही ‘चीटर चीटर’ ओरडू लागले.
झाले असे की, भारताच्या दुसऱ्या डावातील 8वे षटक ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड (Scott Boland) टाकत होता. यावेळी शुबमन गिल (Shubman Gill) स्ट्राईकवर होता. यावेळी बाहेर जाणारा चेंडू गिलच्या बॅटची कड घेऊन गलीमध्ये थांबलेल्या कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या दिशेने गेला. यावेळी ग्रीनने एका हाताने भन्नाट झेल घेतला. त्याच्या या झेलावर निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचांनी बराच वेळ लावला.
यानंतर शेवटी पंचांनी शुबमन गिल याला झेलबाद घोषित केले. हा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळे निर्णायक स्थितीत तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहून क्रिकेटप्रेमींनीही स्टेडिअममध्ये ‘चीटर चीटर’ अशी आरडाओरड केली. यादरम्यानच्या काही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Crowd shouting “Cheater, Cheater”. pic.twitter.com/qmaLUd2PiR
— Johns. (@CricCrazyJohns) June 10, 2023
आयसीसीनेही यादरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “चुकीचा निर्णय, पहिल्या लूकवरून निर्णय घेतला.” दुसऱ्या एकाने म्हटले की, “पंचांनी खराब निर्णय दिला.” आणखी एकाने कमेंट करत असे लिहिले की, “हा एकदम स्पष्ट नाबाद होता.”
https://www.instagram.com/p/CtUCE11PdR-/
शुबमन स्वस्तात बाद
शुबमन गिल पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला. त्याने यादरम्यान 19 चेंडूंचा सामना करताना 18 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 चौकारही मारले. (The Oval crowd started chanting ‘cheater, cheater’ after the 3rd umpire’s decision shubman gill)
महत्वाच्या बातम्या-
कांगारूंच्या दुसऱ्या डावात स्मिथ अन् हेडवरही भारी पडला कॅरे, नाबाद राहत केली ‘ही’ खास कामगिरी
WTC FINAL : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर जाहीर, भारताला कसोटी जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान