भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. त्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वी एक पोस्टर व्हायरल झाला आहे. ज्याने सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनल फॉक्स क्रिकेटच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी विराट कोहली (Virat Kohli) ‘पॅट कमिन्स’सोबत (Pat Cummins) दाखवण्यात आला आहे. हे पोस्टर ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) संघातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दाखवण्यात आले होते. जे सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.
Fox Sports poster for ye BGT.
Indian Captain Rohit Sharma is missing. pic.twitter.com/tYOc3mwnUE
— M (@anngrypakiistan) November 10, 2024
FOX CRICKET POSTER FOR INDIA VS AUSTRALIA 1ST TEST. 🇮🇳 pic.twitter.com/bz5TUl4zby
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 10, 2024
रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच रोहितने एक विधान केले होते. ज्यामुळे पहिल्या कसोटीत तो उपलब्ध नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रोहितने ‘पर्थमधील पहिल्या कसोटीसाठी माझ्या उपलब्धतेबाबत मला खात्री नाही’ असे सांगून चाहत्यांना सस्पेंसमध्ये ठेवले होते.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, रोहितची पत्नी रितिका सजदेह त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची अपेक्षा करत असल्यामुळे रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. मात्र, रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही, याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
महत्त्वाच्या बातम्या-
4 क्रिकेटपटू जे यावर्षी पिता बनले, लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)
केएल राहुलला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता का दाखवला जाऊ शकतो? तीन प्रमुख कारणं जाणून घ्या