यु मुंबा ला हरवल्यावर पुणेरी पलटण ने पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन संध्याकाळच्या आरतीत सहभाग घेतला. संघातील प्रमुख खेळाडू दीपक हुडा, संदीप नरवाल, धर्मराज चेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते
पुणे २८ ऑगस्ट २०१७: यु मुंबाला हरवल्यावर पुणेरी पलटण चा संघ आणि व्यवस्थापनाने पुण्यातील मनाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेदर्शन घेतले आणि संध्याकाळच्या आरतीला उपस्थिती लावली. या प्रसंगी संघाचा कर्णधार दीपक हुडा, मुख्य प्रशिक्षक बी सी रमेश, प्रमुख खेळाडू संदीप नरवाल, धर्मराजचेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते. खेळाडूंनी आरती नंतर भक्तांना प्रसादाचे वाटप केले.
या प्रसंगी बोलताना दीपक हुडा पुणेरी पलटण कर्णधार म्हणाला, ” गणपतीमध्ये बाप्पाचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. बाप्पा हा विद्येचीदेवता आणि अडथळ्यांचा संहारक आहे. आज आम्ही संपूर्ण संघाने आमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी बाप्पाला साकडे घातले असून विजयासाठी आम्हाला शक्तीआणि बुद्धी मागितली आहे. या प्रसंगी मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करा आणि पर्यावरणाचा ह्रासथांबवा.”
कैलाश कांडपाल, सीईओ पुणेरी पलटण म्हणाले, ” कसबा गणपती हि पुण्याची ग्रामदेवता असून दगडूशेठगणपती हे प्रमुख मंडळ आहे. दोन्ही बाप्पाच्या दर्शनाने आमच्यासंघाला उरलेले सामने खेळण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि ताकद मिळाली आहे. ज्याप्रमाणे कबड्डी हा भारतातील प्राचीन खेळ आहे त्याप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सवालादेखील १२५ वर्षांची पार्शवभूमी आहे. आणि यावर्षी हा क्षण अनुभवताना पुणेरी पलटण संघाला एक वेगळाच आनंद झाला आहे. ज्या प्रमाणे कसबा गणपती हा मनाचा पहिलागणपती आहे त्या बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही सुद्धा या हंगामामध्ये नो. १ राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
गणपती मंडळांना भेट दिली असताना दोन्ही मंडळांच्या ट्रस्टींशी खेळाडूंनी संवाद साधला आणि दोन्ही मंडळांनी खेळाडूंचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला. दोन्हीट्रस्टनि पुणेरी पलटणच्या संघाला भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. आरतीला कबड्डी प्रेमींनी हजेरी लावली आणि बरेच प्रशंसक खेळाडूंसोबत फोटोस काढत होते.