---Advertisement---

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

---Advertisement---

यंदा राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला देण्यात आले आहे. तसेच तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. याचे कारण त्याची फलंदाजी किंवा यष्टिरक्षण नव्हे तर, नाणेफेक आहे. होय, संजू सॅमसन नाणेफेकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. तो नाणेफेक झाल्यानंतर नाणे उचलुन आपल्या खिशात का घालतोय? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता यावर त्याने खुलासा केला आहे.

सोमवारी (१९ एप्रिल) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकली होते. ते नाणे संजू सॅमसनच्या अगदी जवळ जाऊन पडले होते. यावेळी त्याने पुन्हा एकदा नाणे उचलून आपल्या खिशात टाकल्याचे पाहायला मिळाले. हे पाहून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीदेखील आश्चर्यचकित झाला होता.

यापूर्वी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील संजू सॅमसनने नाणे खिशात टाकले होते. तेव्हा केएल राहुल देखील आश्चर्यचकित झाला होता.

सॅमसनला जेव्हा विचारण्यात आले की, नाणे खिशात टाकण्यामागचे कारण काय? यावर संजू सॅमसन म्हणाला, “मला आवडते म्हणून मी ते नाणे माझ्या खिशात टाकले होते. पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मॅच रेफरीने नाणे पुन्हा मागितले होते. त्यांनी मला म्हटले होते की, आम्हाला नाणे कर्णधाराला घेऊन जाऊ देण्याची अनुमती नाही. ते नाणे खूप चांगले दिसत होते. पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर मी मॅच रेफरींना विचारले होते की, मी हे नाणे ठेऊ शकतो का? यावर त्यांनी याला नकार दिला होता.”

यांनतर चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील संजूने आपले नशीब आजमावून पाहिले होते. नाणेफेक जिंकल्यानंतर तो रेफरींकडे गेला होता. कदाचित त्याला नाणे हवे असेल. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ४५ धावांनी पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या-

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड

‘पंड्या फॅमिली’चा स्वॅगचं निराळा, झक्कास डान्सने लाखो चाहत्यांना लावलं वेड; एकदा व्हिडिओ बघाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---