ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकाआधीच (T20 World Cup) अनेक संघाना धक्के बसले आहेत किंवा अजूनही बसत आहे. काही संघांचे महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने या स्पर्धेला मुकले आहेत. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर झाला आहे तर एका संघाच्या प्रशिक्षकानेच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे त्या संघाच्या अडचणीत भर पडली आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक लान्स क्लूजनर (Lance Klusener) यांनी राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूने झिम्बाब्वे क्रिकेटचे सहमत घेत आपल्या पदाचा त्याग केला आहे. टी20 विश्वचषकासमोर क्लूजनर यांनी राजीनामा दिल्याने झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत झिम्बाब्वेचा पहिला सामना 17 ऑक्टोबरला आर्यलंड विरुद्ध आहे.
झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक गिव्हमोर माकोनी यांनी देखील क्लुसनरच्या जाण्यावर विधान केले आहे. त्यांनी म्हटले, ” लान्सने आमच्यासोबतच्या असताना जे योगदान दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी मदत केली आहे.”
“दुर्दैवाने, त्यांच्या इतरत्र दबावपूर्ण वचनबद्धतेमुळे, ते आमच्यासोबत पूर्णवेळ काम करू शकत नाही. यामुळे आम्ही त्यांचा करार संपुष्टात आणला असून हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे. त्यांना आम्ही पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो,” असेही माकोनी यांनी पुढे म्हटले आहे.
Lance Klusener has resigned from his post as the Zimbabwe batting coach just days before the start of #T20WorldCup 2022.
Details ⬇️https://t.co/kF0sfTPn2W
— ICC (@ICC) October 8, 2022
झिम्बाब्वे क्रिकेटने निवेदन जाहीर करत ल्कूजनर यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. क्लूजनर हे यावर्षीच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. याआधी त्यांनी 2016 आणि 2018मध्येही संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकामध्ये झिम्बाब्वे आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या संघासोबत ब गटात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..
T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली! ‘तो’ खेळाडू होणार ऑस्ट्रेलियाला रवाणा