---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात महान खेळाडूचे पुनरागमन, जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या संघासाठी खेळणार

---Advertisement---

(19 फेब्रुवारी 9 मार्च) पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट प्रेमींचे मनोरंजन करेल. यादरम्यानच महान सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. ILT20 स्पर्धा (22 फेब्रुवारी ते 16 मार्च) दरम्यान खेळली जाणार आहे. ज्यामध्ये भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सहभागी होणार आहेत. या लीग मध्ये ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा आणि केविन पीटरसन सारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.

इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये सचिन तेंडुलकर इंडियन मास्टर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या संघात सुरेश रैना, युवराज सिंह, इरफान आणि यूसुफ पठाण सारखे दिग्गज खेळाडू असतील. या हंगामाची सुरुवात (22 फेब्रुवारी) रोजी इंडिया मास्टर्स विरुद्ध श्रीलंका अशी होणार आहे आणि याचवेळी सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा उतरणार आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना (25 फेब्रुवारी) रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

सचिन तेंडुलकरला ऑक्टोबर 2022 मध्ये शेवटचे खेळताना पाहिले होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड रेकॉर्ड मालिकेत खेळत होता. त्यादरम्यान इंडिया लेजंड्सचा सामना श्रीलंकेसोबत झाला होता. भारताने त्या सामन्यात 195 धावा केल्या व श्रीलंकेचा 33 धावांनी धुव्वा उडवला होता.

इटरनॅशनल मास्टर्स लीग मध्ये इंडिया मास्टर्स चा संघ: 

सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, गुरकीरत सिंह मान, युवराज सिंह, स्टुअर्ट बिन्नी, यूसुफ पठान, इरफान पठान, पवन नेगी, नमन ओझा (यष्टिरक्षक), अभिमन्यू मिथुन, धवल कुलकर्णी, राहुल शर्मा, शाहबाज नदीम और विनय कुमार.

 

महत्वाच्या बातम्या: 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी!

क्रिकेटपटू जहीर खानची नवी घरखरेदी, किंमत ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील!

RCB vs DC; आरसीबीनं जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---