इंग्लंडमध्ये कोरोनाच्या सावटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झाले असले तरी भारतीय खेळाडू मात्र अद्यापही घरीच आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर क्रिकेटला सुरुवात होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. जेव्हा क्रिकेटला सुरुवात होईल तेव्हा तीन भारतीय क्रिकेटपटूचं पुनरागमन अवघड होणार आहे. वाढत्या वयामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. या तीन क्रिकेटपटूंची माहिती पुढीलप्रमाणे.
सुरेश रैना
भारतीय क्रिकेटसाठी सुरेश रैनाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. जुलै 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या दोन वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. 2021 मध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात टीमसाठी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी रैनाला स्थानिक क्रिकेटमध्ये धावा काढाव्या लागणार आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंगच्या संघाकडून क्रिकेट खेळतो. आयपीएलच्या माध्यमातून तो भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करू शकणार होता. मात्र यंदा आयपीएलच्या स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. रैनाचे वय 33 वर्षं आहे. यावर्षी आयपीएलच्या स्पर्धा रद्द झाल्या तर त्याचं पुनरागमन कठीण ठरणार आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर सारख्या प्रतिभावान खेळाडू सुरेश रैनाची जागा घेतली आहे. 17 जुलै 2018 साली त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
एमएस धोनी
भारताचा 39 वर्षीय माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयसीसी विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळला होता. त्यात भारताचा पराभव झाला होता. यंदाच्या वर्षात आयपीएल स्पर्धा झाली नाहीत तर धोनीचे देखील पुनरागमन अवघड ठरणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार होती परंतू त्या स्पर्धेचेही आता कठीण झाले आहे.
दिनेश कार्तिक
यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात शेवटचा खेळताना दिसून आला. भारताला रिषभ पंत, केएल राहुल सारखे यष्टीरक्षक मिळाल्याने दिनेश कार्तिकचं पुनरागमन होणं जवळजवळ अशक्य आहे. यष्टिरक्षक म्हणून पंत आणि केएल राहुलने चांगली कामगिरी केली आहे. वाढत्या वयामुळे रैना आणि धोनीप्रमाणे त्याचेही पुनरागमन अवघड आहे. आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकात खेळण्यासाठी तो देखील प्रयत्न करेल.