भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात सध्या 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला टी20 सामना ग्वाल्हेरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखून बांगलादेशवर विजय मिळवला. आता दुसरा टी20 सामना उद्या (9 ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी आपण दिल्लीच्या स्टेडियमवर हवामान कसे असेल? हे जाणून घेऊया.
ऐक्युवेदरच्या वेबसाइटनुसार, दिल्लीमध्ये (9 ऑक्टोबर) रोजी आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. दिवसा तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते आणि रात्री 24 अंशांपर्यंत. मैदानावरील ढग दिवसा फक्त 3 टक्के असतील आणि रात्री ते 2 टक्क्यांपर्यंत घसरतील असा अंदाज आहे. पण (9 ऑक्टोबर) आणि येत्या काही दिवसात दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे चाहत्यांना सामना लाइव्ह पाहण्यात काही अडथळे येण्याची आशा नाही.”
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या शानदार विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत-बांगलादेश संघात आतापर्यंत एकूण 16 टी20 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारताने 15 वेळा विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Champion’s Trophy; भारतीय संघ ठरवणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचे ठिकाण?
माजी दिग्गजाचा भारताच्या युवा खेळाडूला सल्ला! म्हणाला, “त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध…”
अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, 27 वर्षांचा दुष्काळ संपवल्याचं बक्षीस मिळालं