भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा टी20 सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही.
भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. युवा नितीश कुमार रेड्डीच्या (Nitish Kumar Reddy) जागी वाॅशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संघात स्थान मिळाले आहे, तर डावखुरा फलंदाज रिंकू सिंहच्या (Rinku Singh) जागी ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) खेळताना दिसेल.
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
भारत-संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
दोन्ही संघातील पहिला टी20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यात सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 7 गडी राखून दमदार विजय आपल्या नावावर करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) तुफानी अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी गिल फॉर्ममध्ये परतला, झळकावले शानदार शतक, टीकाकारांची बोलती बंद!
आयसीसीकडून वर्षातील सर्वोत्तम टी20 संघाची घोषणा, हिटमॅनची कर्णधारपदी वर्णी..!
पाकिस्तानच्या हरिस रौफचा घमंड तुटणार, अर्शदीपकडे ही कामगिरी करण्याची उत्तम संधी