सध्या भारत आणि इंग्लंड संघात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या कसोटीचा पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर ४ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघाला फलंदाजी करत फक्त सर्वबाद १८३ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून पहिल्या डावाची सुरुवात शानदार झाली.
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी ९७ धावांची भागीदारी केली. ही भागादारी रोहित शर्मा ३६ धावा करुन बाद झाल्याने तुटली. त्यांनी ३७.३ षटके एकत्र फलंदाजी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे एक मोठा विक्रम झाला आहे. गेल्या १४ वर्षांतील भारतीय संघाकडून आशिया खंडाबाहेर केलेली ही सर्वात लांब सलामी भागीदारी ठरली आहे.
यापूर्वी आशिया खंडाबाहेर भारताकडून ३८ षटकांपेक्षा अधिक वेळ सलामी भागीदारी वासिम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनीही ट्रेंट ब्रिज मैदानावरच हा कारनाना केला होता. त्यांनी २००७ साली ४२.१ षटकांत १४७ धावांची सलामी भागीदारी केली होती.
एवढेच नाही तर, २००७ सालानंतर भारताकडून इंग्लंडमध्ये झालेली ही सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी भारताकडून इंग्लंडमध्ये ९७ किंवा त्यापेक्षा अधिक धावांची सलामी भागीदारी २००७ साली जाफर आणि कार्तिक यांनीच केली होती.
भारतीय संघाची मधली फळी कोलमडली
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताची मधली फळी लवकर कोलमडली. चेतेश्वर पुजारा ४ धावांवर, विराट कोहली शुन्यावर, तर अजिंक्य रहाणे ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा भारताने ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ मुंबईकरामुळे पांड्याची टीम इंडियातील जागा आहे धोक्यात, कमबॅकही झालंय अवघड
जर्मनीला धूळ चारल्यानंतर भारतीय गोलकीपरने केले असे काही, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
विराटने वाईट दिवसांची काढली आठवण; म्हणाला, ‘कठीण काळात सचिनला मदत मागितली आणि…’