भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर न्यूझीलंडने 3-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. या शानदार विजयाहस न्यूझीलंडने इतिहास रचला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारताला घरच्या मैदानावर 3-0 ने पराभव करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. न्यूझीलंडने बंगळुरूच्या मैदानावरील पहिला कसोटी 8 गडी राखून जिंकला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमवर न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना 113 धावांनी जिंकला. यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना 25 धावांनी जिंकला.
भारतीय संघाने 1933-34 मध्ये पहिल्यांदा घरच्या भूमीवर कसोटी मालिका खेळली, जी इंग्लंडविरूद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका होती, ज्यामध्ये इंग्लंडने 2-0 ने विजय मिळवला. आता भारतात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 ने पराभूत करणारा न्यूझीलंड हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. टॉम लॅथमच्या (Tom Latham) नेतृत्वाखाली न्यूझीलंडने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
1933 पासून पाहिले तर तब्बल 91 वर्षांनंतर भारतीय संघाला 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताला हा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
भारताला आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीने भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 सामने जिंकावे लागतील. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेला (22 नोव्हेंबर) पासून सुरूवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले तुफानी शतक!
IND vs NZ; भारतीय संघ अडचणीत असताना रिषभ पंतचे शानदार अर्धशतक!
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये सलामीला येणार ‘हे’ स्टार खेळाडू! दिग्गजाचे मोठे वक्तव्य