आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात फलंदाज बऱ्याचदा वर्चस्व गाजवताना दिसतात. परंतु काहीवेळा असे दिसून येते की एखादा फलंदाज गोलंदाजांसमोर फेल ठरतो मग गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात करतो. त्यामुळे बऱ्याचवेळा काही फलंदाज संथगतीने खेळतानाही दिसतात.
तसेच अनेकवेळा एखादा फलंदाज एकाकी झुंज देत शानदार खेळीही साकारतो. पण तरीही त्याला त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश येते. या लेखातही आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली खेळी तर केली पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे कदाचीत त्यांची खेळी ही त्यांनी संघासाठी नाही तर स्वत:साठी केल्यासारखी वाटली.
अंबाती रायुडू
अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विश्वासू खेळाडूंपैकी एका आहे. चेन्नईकडून अंबाती रायुडू ६ सामने खेळले आहे. पण यावर्षी रायुडूने अपेक्षेपेक्षा कमी वेगवान फलंदाजी केली. रायुडूने आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान तर अतिशय धीमी फलंदाजी केली होती त्याचा परिणाम संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रायडूने त्या सामन्यात ४० चेंडूत ४२ धावा केल्या आणि त्याच सामन्यात चेन्नईला ३८ धावांनी पराभव पत्करावा लागला.
केदार जाधव
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केदार जाधवनेही कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अत्यंत वाईट कामगिरी केली. त्यानंतर त्याला केवळ टीकांचा सामना करावा लागला नाही तर चेन्नई सुपर किंग्जने अंतिम अकरामधूनही त्याला बाहेर काढले.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात केदार जाधवने १२ चेंडूत केवळ ७ धावा केल्या होत्या, त्या सामन्यात केदार जाधव मैदानावर आला तेव्हा चेन्नईला २१ चेंडूत ३९ धावांची गरज होती. अशा परिस्थित जाधवने ८ चेंडू निर्धाव खेळले. जाधवच्या खराब खेळीमुळे चेन्नईने सामना १० धावांनी गमावला.
केएल राहुल
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलनेही असाच एक डाव खेळला होता. जो संघासाठी उपयोगी पडला नव्हता. त्या सामन्यात पंजाबचा विजय निश्चितच दिसत होता, परंतु पंजाबच्या खेळाडूंनी शेवटच्या काही षटकात केलेल्या खराब कामगिरीमुळे संघात खळबळ उडाली.
कर्णधार राहुलने ५८ चेंडूत ७२ धावा फटकावल्या, पण शेवटच्या षटकात त्याने चूक केली, जेव्हा त्याला स्वतःकडे स्ट्राइक घेण्याची गरज होती, तेव्हा त्याने युवा खेळाडू सिमरन सिंगला स्ट्राइक दिली, हीच गोष्ट संघासाठी भारी पडली. सामन्यादरम्यान सिमरनने ७ चेंडूत फक्त ४ धावा केल्या आणि सामन्यात पंजाबला अवघ्या २ धावांनी पराभव पत्करावा लागला. अशा परिथितीमध्ये केएल राहुल स्ट्राइकवर असता तर कदाचित सामन्याचे चित्र वेगळे असते. केएल राहुल यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.