कोलंबो: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातली दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे सुरु होत आहे. या सामन्याच खास वैशिष्ट्य म्हणजे आयसीसी क्रमवारीत पहिल्या ३ स्थानावर असणारे तीन दिग्गज खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.
आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारा भारताचा रवींद्र जडेजा (८९७ गुण), आर अश्विन (८४९ गुण) आणि रंगना हेराथ (८२८ गुण) हे तीन खेळाडू आहेत. यातील जो खेळाडू खराब कामगिरी करेल त्याची क्रमवारी खालावून यातीलच दुसरा खेळाडू ती जागा घेणार असल्यामुळे तिघांनाही चांगला खेळ करावा लागणार आहे.
दोनही संघातील अन्य कोणताही गोलंदाज पहिल्या २० गोलंदाजातही नाही.