---Advertisement---

U19 WC । फायनलमध्ये भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट! ‘या’ एका विकेटने पालटला डाव

On: सोमवार, फेब्रुवारी 12, 2024 11:31 AM
Mahli Beardman
---Advertisement---

अंडर 19 विश्वचषक 2024 हंगाम रविवारी (11 फेब्रुवारी) संपला. अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा थरार चाहत्यांनी पाहिला. पण हा सामना पाहिजे तितका रंगतदार झाला नाही. भारतीय संघाचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाने रविवारी अंतिम सामन्यात 79 धावांनी भरताला पराभूत केले. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा ही ट्रॉफी उंचावली.

उभय संघांतील या अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघ (Team India) फलंदाजी आणि त्याचसोबत गोलंदाजीतही चांगले प्रदर्शन करू शकला नाही, असे म्हणता येईल. ऑस्ट्रेलायने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 253 धावा केल्या. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामन्यात एखाद्या संघाने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या 174 धावांवर सर्वबाद झाला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाला सामन्यातील टर्निंग पॉइंट उदय सहारन (Uday Saharan) याची विकेट ठरली, असे म्हणता येईल. कारण भारतीय संघाचा कर्णधार उदय संपूर्ण मालिकेत भारतासाठी मध्यक्रमातील महत्वाचा फलंदाज राहिला. उदय जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पराभवाची भीती होती. सहारन याने 19 वर्षांखालील विश्वचषक 2024 मध्ये खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 56.71च्या सरासरीने सर्वाधिक 397 धावा केल्या आहेत. अशात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सहारनच्या विकेटचे महत्व माहीत होते. जर त्याने खेळपट्टीवर पाय रोवले असते, तर भारतीय संघ अंतिम सामन्यात विजेतेपदसाठी नक्कीच दावेदार होता.

असे असले तरी, भारताच्या डावातील 17व्या षटकात महली बियर्डमन (Mahli Beardman) याने सहारनला वैयक्तिक 8 धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियन कर्णधार ह्यू वेबगेन याने सहानचा झेल घेतला. त्याआधी मुशीर खान याचीही विकेट बियर्डमन यानेच घेतली. सलामीवीर आदर्श सिंग यानेही बियर्डमन यालाच विकेट सोपवली. भारतासाठी या सामन्यात एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही.

महत्वाच्या बातम्या – 
U19 Word Cupमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू, पराभवानंतर भारतीय खेळाडू टॉपवर
U19 WC Final । भारताचा बदला अपुराच! अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून यंग इंडियाही पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---