क्रिकेटमधील अनेक अनोखे पराक्रम तुम्ही पाहिले असतील. परंतु हा प्रसंग खरोखर अद्वितीय आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या सिंध प्रीमियर लीगमध्ये विचित्र आऊट पाहायला मिळाले. खरं तर, स्पर्धेच्या एका सामन्यात गोलंदाजाने कोणतेही अपील न करता पंचांनी फलंदाजाला आऊट दिले.
क्रिकेटच्या नियमांबद्दल सांगायचे तर, मैदानावर उपस्थित अंपायर फलंदाजाला तोपर्यंत आऊट देऊ शकत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विकेटसाठी अपील करत नाही, पण इथे काही वेगळेच पाहायला मिळाले, जेव्हा पंचांनी विकेटसाठी अपील न करता बोट वर केले.
सिंध प्रीमियर लीगच्या या रंजक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलर बॉल फेकतो आणि बॉल बॅट्समनच्या पॅडवर आदळत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. चेंडू आदळल्यानंतर थोडासा आवाज येतो, परंतु असे दिसते की चेंडू एलबीडब्ल्यूसाठी लेग साइडकडे जात आहे आणि तो आऊट होणार नाही.
चेंडू लेग साईडला जाताना पाहून गोलंदाजही अशी रिऍक्शन देतो की फलंदाज बाद होण्यापासून थोड्यावर चुकला आणि तो आपल्या डोक्याला हात लावतो. या चेंडूवर गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून कोणत्याही प्रकारचे अपील होत नाही, परंतु गोलंदाजाच्या मागे काहीतरी वेगळेच दिसते.
What is happening in Sindh Premier League? 🤯
The bowler didn't even appeal and it was clearly sliding down leg, but the umpire gave the batter out 🤦🏽♂️🤦🏽♂️ pic.twitter.com/IXmiY51DZo
— Farid Khan (@_FaridKhan) January 26, 2024
गोलंदाजाच्या मागे उभा असलेला अंपायर कोणतेही अपील न करता आऊटसाठी बोट वर करतात, जे पाहून सगळेच हैराण झाले. विकेटनंतर बाद झालेल्या खेळाडूची प्रतिक्रिया खूपच विचित्र असते. फलंदाज विचार करायला लागतो आणि हसायला लागतो. (The umpire gave out without appeal, an interesting incident happened in Pakistan cricket)
हेही वाचा
‘विराट कोहली असता तर…’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केएल राहुलचे शतक हुकण्याबाबत केले मोठे वक्तव्य
IND vs ENG: पहिल्या डावात 436 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट, राहुल-जडेजाने दाखवली ताकद