भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना देखील भारतात सुरक्षेची काळजी घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने आयसीसीने काही नियम लागु केले आहेत, ज्यांचे पालन खेळाडूंना करावेच लागते. मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने आयसीसीचा एक नियम मोडल्याचे दिसून आले होते, ज्यामुळे अंपायरने त्याला वॉर्निंग दिली होती.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ फलंदाजी करत असताना सातवे षटक टाकण्यासाठी रिषभ पंतने अमित मिश्राला बोलावले होते. या षटकातील पहिलाच चेंडू फेकण्यापूर्वी अमित मिश्राने चेंडूवर लाळ लावल्याचे चित्र दिसून आले होते. ही बाब अंपायरच्या निदर्शनात येताच अंपायरने त्याला पहिली वॉर्निंग दिली होती. असे करणे आयसीसीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अंपायरने त्वरित चेंडू सॅनिटाइज केला होता.
काय आहे आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नवीन नियमावलीनुसार, जर कुठला खेळाडू चेंडूवर लाळ लावताना आढळून आल्यास त्याला आधी वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्यांदा असं काही घडलं तर त्या संघाला ५ धावांची पेनल्टी देण्यात येईल. २०२० पासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे नियम लागू करण्यात आले होते.
https://twitter.com/pant_fc/status/1387057522436022274?s=20
असा झाला सामना
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ३१ धावा केल्या होत्या. यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने २५ धावांचे योगदान दिले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर १७१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना रिषभ पंतने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली तर शिमरॉन हेटमायरने ५३ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता असताना रिषभ पंतने चौकार मारला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा सामना १ धावाने आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! महिला आयपीएल २०२१ सुरू होण्यापुर्वीच संकटात, ‘या’ कारणामुळे हंगाम होणार स्थगित?
“एबीला माझा सलाम, अजूनही वाटत नाही तो निवृत्त झाला आहे,” कोहलीने केली स्तुती