इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफ फेरीत दाखल झाले आहेत. रविवारी (21 मे) गुजरात टायटन्सने लीग स्टेजचा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध जिंकला. आरसीबीच्या या पराभवामुळे मुंबई संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला. या सामन्यानंतर गुजरातने शेअर केलेल्या एका व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.
रविवारी (21 मे) झालेल्या डबल हेडरनंतर आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये खेळणारे चारही संघ निश्चित झाले. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकत होता. मात्र, गुजरातने त्यांना जिंकण्याची संधी दिली नाही. त्याधी दिवसातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला होता. मुंभईने हा सामना जर 11.5 षटकात जिंकला, असता तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यापासून कोणीच रोखू शकत नव्हते. पण विजयासाठी मुंबईला 18 षटके लागली, ज्यामुळे आरसीबीकडेही प्लेऑफची संधी होती. मात्र, रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या सामन्यात आरसीबीला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.
आता आयपीएल 2023च्या पहिला क्लॉलिफायनर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. मंगळवारी (23 मे) होणाऱ्या या सामन्याआधी गुजरात टायटन्सने एक व्हिडिओ शेअर केला. यात सीएसकेचा कर्णदार एमएस दोनी, हार्दिक पंड्या, ईशान किशन आणि कृणाल पंड्या दिसत आहेत. यावर्षी प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चाहरी संघांचे सदस्य या व्हिडिओत डान्स करताना दिसत असल्याने चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. माहितीनुसार हा व्हिडिओ जुनाच आहे. पण आयपीएल 2023च्या प्लेऑफचे संघ निश्चित झाल्यानंतर गुजरातने चाहत्यांची फिरकी घेण्यासाठी ही पोस्ट केली आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
https://www.instagram.com/reel/CshBPh2hTBZ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
अंतिम सामन्यात कोण पोहोचणार
दरम्यान, क्लॉलिफायनर एकमध्ये गुजरात आणि सीएसके आमने सामने आहेत. या दोघांपैकी जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात धडक देईल. पराभूत होणाऱ्या संघाला क्लॉलिफायर दोन खेळावी लागणार आहे. बुधवारी (24 मे) मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होईल, जिंकणाऱ्या संघाला अंतिम सामन्याआधी अजून एक विजय मिळवावा लागणार आहे. क्लॉलिफायनर एकमध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघात क्लॉलिफायर दोन सामना शुक्रवारी (26 मे) खेळला जाईल. क्लॉलिफायर दोनमध्ये जिंकणारा संघ मात्र अंतिम सामन्यासाठी पात्र असेल. (The video of MS Dhoni and Hardik Pandya’s dance is going viral after playoff teams was decided)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
महाराष्ट्र प्रीमियर लीग । 15 जूनपासून पुण्यात सुरू होणार क्रिकेट सामन्यांचा थरार