वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू गोलंदाजी अष्टपैलू फॅबियन ऍलन याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एसएटी20 या लीगमध्ये फॅबियन पार्ल रॉयल्स संघाचा भाग आहे. पण जोहान्सबर्गमध्ये टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, त्या हॉटेलबाहेर फॅबियनची लूट केली गेली. कॅरेबियन स्टार क्रिकेटपटू या घटनेत थोडक्यात वाचला असून त्याला लुटण्यासाठी चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवल्याचे सांगितले जात आहे.
क्रिकेबजने याविषयी सविस्तर वृत्त दिले आहे. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू फॅबियन ऍलन (Fabian Allen) याला जोहान्सबर्गमध्ये बंदुकीचा धाक दाखवण्यात आला. पार्ल रॉयल्स संघ जोहान्सबर्गमध्ये सुप्रसिद्ध सँडटन सन हॉटेलमध्ये मुक्कामी होता. यावेळी फॅबियन हॉटेलच्या खाली उभा असताना चोरांनी त्याला घेरले. त्याच्याकडे असलेला महागडा फोन आणि बॅग चोरांनी हिसकावून घेतली. बॅगेत अष्टपैलूचे काही वैयक्तिक गोष्टी होत्या, असे समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर एसए20 लीग खेळण्यासाठी आलेल्या विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली की, “आमचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे कोली फॅबियनशी बोलले आहेत. तो ठीक आहे. ओबेड मॅकॉयच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला गेला.” दरम्यान, एसए20 लीगमधील ही अलिकडच्या काळातील दुसरी घटना आहे, ज्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
Fabian Allen attacked and robbed at gunpoint at Paarl Royals’ team hotel in Johannesburg.
– Robbers snatched his phone and bag. (Cricbuzz). pic.twitter.com/ddpsJaSc2D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2024
दक्षिण आफ्रिका प्रीमियर लीग म्हणजेच एसए20 लीगचा हा दुसरा हंगाम आहे. सध्या या लीगमध्ये प्लेऑफ फेरी सुरू आहे. पार्ल रॉयल्स संघ क्वालिफायर एकनंतर आता गुरुवारी (7 फेब्रुवारी) रोजी एलिमिनेटर सामना खेळमार आहे. 10 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे. (The West Indies all-rounder was robbed at gunpoint)
महत्वाच्या बातम्या –
मुंबई ओपनमध्ये भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीचा मुख्य फेरीत प्रवेश
अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत अवधुत निलाखे, पियुश रेड्डी यांनी गाजवला उदघाटनाचा दिवस