महिला प्रीमियर लीग (WPL 2025) साठी खेळाडूंचा लिलाव रविवारी (15 डिसेंबर) बंगळुरू येथे होणार आहे. ज्यामध्ये एकूण 120 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 5 फ्रँचायझी या लिलावाचा भाग असणार आहेत. लिलाव पूलमध्ये 91 भारतीय खेळाडू आणि 29 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये असोसिएट नेशन्समधील 3 उदयोन्मुख प्रतिभांचा समावेश आहे.
यापैकी 30 खेळाडू कॅप्ड आहेत (9 भारतीय, 21 विदेशी), तर 90 अनकॅप्ड (82 भारतीय, 8 विदेशी). बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांचे मुख्य खेळाडू कायम ठेवल्यामुळे, केवळ 19 स्लॉट खुले आहेत. त्यामध्ये विदेशी खेळाडूंसाठी 5 स्लाॅट आहेत. या वर्षीच्या लिलावातील प्रमुख खेळाडूंमध्ये तेजल हसबनीस, स्नेह राणा, डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज), हेदर नाइट (इंग्लंड), ओरला प्रेंडरगास्ट (आयर्लंड), लॉरेन बेल (इंग्लंड), किम गर्थ (ऑस्ट्रेलिया) आणि डॅनियल गिब्सन (इंग्लंड) यांचा समावेश आहे. यामध्ये इतर अनेक प्रमुख नावांचाही समावेश आहे.
कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?
दिल्ली कॅपिटल्स- 2.5 कोटी
गुजरात जायंट्स- 4.4 कोटी
मुंबई इंडियन्स- 2.65 कोटी
यूपी वॉरियर्स- 3.9 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 3.25 कोटी
खेळाडूंचा लिलाव दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, तर प्रसारण 30 मिनिटे आधी सुरू होईल. तुम्ही जिओ सिनेमा (JioCinema) वर लिलाव लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. त्याच वेळी, स्पोर्ट्स 18-1 (एसडी आणि एचडी) वर दूरदर्शनवर यावर देखील खेळाडूंचा लिलाव प्रसारित केला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद कांबळी एकेकाळी विराट-जडेजापेक्षा फिट होता! या एका कारणामुळे बरबाद झालं करिअर
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया, चाहत्यांना खूश करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!