जॉस बटलर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत आहे. राजस्थान विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात धोनीने बटलरला आपली जर्सी भेट केली. यामुळे बटलर धोनीवर प्रचंड खुश झाला. तसेच त्याने माध्यमांशी केलेल्या चर्चेत धोनीबाबत स्तुतीसुमनेदेखील उधळली.
इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलरने धोनीबाबत मोठे विधान केले आहे. 2011 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेला विजयी षटकार मला जास्त भावला आणि त्यामुळे मी जास्त प्रेरित झालो, असे जॉस बटलरने म्हटले आहे.
अशी केली जॉस बटलरने धोनीची स्तुती
जॉस बटलरला धोनीचे मैदानातील वागणे जास्त भावते. खेळ करताना शांतपणे खेळणे हे जास्त आवडत असल्याचे तो म्हणतो. फलंदाजी करताना धुव्वादार फटके मारणे, हेलिकॉप्टर शॉट तसेच टीव्हीवर पाहिलेले धोनीचे काही सामने अजूनही बटलरच्या लक्षात आहेत. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली व शेवटचा विजयी षटकार मारला तो अजूनही लक्षात असून ती माझ्यासाठी एक प्रेरणा बनली आहे, असे बटलरने म्हटले आहे.
धोनी हा एक सर्वोत्तम कर्णधार तसेच खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीची तिन्ही विजेतीपदे जिंकली आहेत. हा कारनामा करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे असे बटलर म्हणतो. धोनी जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचेही बटलरने पुढे म्हटले आहे. जॉस बटलर धोनीला स्वतःचे प्रेरणास्थान मानत असून या अगोदरही त्याने बऱ्याचवेळा तसे बोलून दाखवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गर्वाचे घर खाली! सहज ट्वीट सेव्ह करतो म्हणणारा राजस्थान संघ पडला तोंडघशी; ट्रोलर्सनी धरलं धारेवर
पॅट कमिन्सने साकारला कोलकाताचा ‘रॉयल’ विजय; प्लेऑफमधून राजस्थानचा पत्ता कट
‘सेहवागचा आदर्श डोळ्यापुढे ठेव,’ खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला माजी क्रिकेटरचा मोलाचा सल्ला
ट्रेंडिंग लेख –
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण






