इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंड संघाचे विश्लेषक नॅथन लेमन याने ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीतून प्लेकार्ड दाखवून कर्णधार इयान मॉर्गनला काही सांकेतिक संदेश पाठवले. ज्यावर आता क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आले आहे. बर्याच दिग्गजांनी इंग्लंड क्रिकेट संघाच्या या रणनितीवर टीका केली आहे. यात माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडन यांचाही समावेश आहे.
“तर मग कर्णधाराची गरज कशाला?”
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, टी-20 क्रिकेटमध्ये जेव्हा कर्णधाराला कोणता निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तो पहिल्यांदा प्रशिक्षक किंवा सहाय्यक पथकाशी किंवा वरीष्ठ खेळाडूंसह चर्चा करतो आणि निर्णय घेतो. मात्र जर हे (प्लेकार्ड उपाय) खेळाच्या नियमांचा भाग झाला तर मला वाटते हे योग्य नाही होणार.”
माजी फलंदाज लक्ष्मण म्हणाला, “तुम्हाला वाटते की कर्णधार आपली भूमिका पार पाडत नाहीतर तुम्हाला कर्णधाराची काय गरज आहे. आणि संघाला फुटबॉल प्रमाणे चालवले जाऊ शकते, जिथे व्यवस्थापक मैदानाच्या बाहेरून खेळाला नियंत्रित करतात. ”
मॅथ्यू हेडनने देखील दिली प्रतिक्रिया
लक्ष्मण शिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने देखील यावर आपले विचार मांडले आहेत. परंतु त्याला चिंता आहे की, ही रणनिती किती प्रभावी आहे. हेडन म्हणाला, “या सर्वांचे महत्त्व काय आहे. हे किती प्रभावी होईल? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जर त्या दरम्यान वेगाने धावा केल्या तर हे सांकेतिक आपसात उलटू शकते आणि संवादाचे सर्व महत्व त्याच्यासाठी आहे. तुम्ही सोबत येता, तुम्ही निश्चित करता की योजना सर्वाना माहित आहे, आणि मग तुम्ही ती योजना लागू अमलात आणता. तुम्ही याला केवळ समजून नाही सोडू शकत.”
संबधित बातम्या:
– तू भारतीय नाही, पैशांसाठी देश सोडला, शेतकरी कृषी कायद्याविषयी बोलणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूवर चाहत्यांची टीका
– ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
– जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक