आगामी आयपीएल मेगा लिलावाची (IPL Mega Auction) चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. आगामी मेगा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. यंदाच्या मेगा लिलावात रिषभ पंत (Rishabh Pant), जोस बटलर (Jos Buttler) आणि केएल राहुलसारखे (KL Rahul) स्टार खेळाडू दिसणार आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की लिलावात किती खेळाडूंवर बोली लागेल आणि त्यापैकी किती खेळाडूंची विक्री होणार आहे?
आयपीएल 2025च्या मेगा लिलावासाठी जगभरातून एकूण 1,574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. सर्व 10 संघांनी यापैकी 574 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले आहे. म्हणजेच लिलावादिवशी 24-25 नोव्हेंबरला एकूण 574 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये 366 भारतीय आणि 208 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावात 574 खेळाडू असणार आहेत. मात्र यापैकी केवळ 204 खेळाडूच खरेदी केले जातील. आयपीएल 2025 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होतील आणि प्रत्येक संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. याचा अर्थ असा आहे की, आयपीएलच्या कोणत्याही एका हंगामात खेळाडूंची कमाल संख्या 250 असू शकते, परंतु लिलावापूर्वी 10 संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे, याचा अर्थ 204 खेळाडूंचे स्लॉट अद्याप रिकामे आहेत.
यावेळी बीसीसीआयने (BCCI) आयपीएल संघांची पर्स 120 कोटी रुपयांपर्यंत वाढवली होती, म्हणजेच लिलावातील प्रत्येक संघाकडे आपापल्या संघाला तयार करण्यासाठी 120 कोटी रुपये असतील. पण लिलावापूर्वी सर्व 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. ज्यांच्यावर 588.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित 204 स्लॉट भरण्यासाठी सर्व 10 संघांकडे एकूण 641.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिवशी होणार चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत की पाकिस्तान कोणाचा पत्ता कटणार?
IND vs AUS; विराट कोहली धावांचा भुकेला आहे, माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
बाबर आझमने मोडला विराटचा रेकाॅर्ड! आता नंबर रोहितचा