आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असल्यामुळे सर्व चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत पाकिस्तान सामना तोही चॅम्पियन्स ट्रॉफी मधील असेल तर जुने विक्रम ओघानेच शोधले जातात.
कुणी किती धावा केल्या, कोण किती वेळा जिंकल, कुणाची सरासरी जास्त आहे वगैरे. परंतु असही एक रेकॉर्ड आहे जे कायमच भारतासाठी चांगलं ठरलं आहे. होय जून महिना हा भारतीय क्रिकेटसाठी कायमच लकी ठरत आलेला आहे.
जून महिन्यात भारतात मान्सूनच आगमन होत. त्यामुळे भारतात त्या काळात क्रिकेटचे सामने होत नाहीत. परंतु भारतीय संघाने अगदी पहिल्यापासून या महिन्यात आपला विजय मिळवण्याचा सिलसिला सुरु ठेवला आहे.
असे आहेत भारताचे या महिन्यातील रेकॉर्डस्
#१ जून १९३२ साली भारत आपला अधिकृत कसोटी सामना खेळला.
#२ जून १९८३ साली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला.
#३ जून १९८६ भारताने पह्लीयांदाच लॉर्डवर कसोटी सामना जिंकला.
#४ जून २०१३ साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडच्याच भूमीत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.