---Advertisement---

डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये खेळण्याच्या भारताच्या आशा बळावल्या, ‘ही’ गोष्ट घडताच फायनलमध्ये पोहोचू शकतो भारत

On: बुधवार, डिसेंबर 28, 2022 3:32 PM
India vs Bangladesh 4rth day Stumps
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमधील बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ठिकाणी खेळवला जात आहे. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने आपले वर्चस्व निर्माण केले आहेे. मेलबर्न कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ लवकर संपवावा लागला, पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर आपली जबर पकड बनवली आहे. ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. जर हा सामना दक्षिण आफ्रिका संघ हारला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या अपेक्षा बळावणार आहे.

जर ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकण्यात यश आले, तर भारतासाठी ही चांगली बातमी असणार आहे, कारण यामुळे भारतीय संघाची आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना खेळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघाचा आणखी एक पराभव त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना खेळण्यापासून वंचित ठेवू शकतो.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 1 गडी गमावत 15 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 8 गडी गमावत 575 धावा केल्या आणि आपला डाव घोषीत केला. ऑस्ट्रेलिया अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा 371 धावांनी पुढे आहे. सरेल एरवी (Sarel Erwee) आणि थ्यूनिस डी ब्रुएन (Theunis De Bruyn) अनुक्रमे 7 आणि 6 धावा करुन नाबाद आहेत.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील ऑस्ट्रेलिया संघाने आपले वर्चस्व सुरु ठेवले. दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 386 धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला सलामीवीर फलंदाज डेनिड वॉर्नर (David Warner) तिसऱ्या दिवशी देखील फलंदाजीसाठी आला होता, मात्र आपल्या धावसंख्येत एकही धाव जोडता तो बाद झाला. तसेच दुखापत झालेला अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) देखील फलंदाजीसाठी आला. तो 51 धावा करत नाबाद राहिला. ऍलेक्स केरी (Alex Carry) याने झंझावती शतक झळकावले आणि 111 धावा करत बाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---