श्रीलंकेच्या संघाला मायदेशात भारतीय संघाकडून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागला आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर थोडे नाराज झाले आणि त्यांनी आपल्या खेळाडूंना सोशल मीडिया आणि त्याच्या नकारात्मकतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. एका प्रसिद्ध पत्रकाराच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे.
त्या मुर्खांना काही माहीत नसते
श्रीलंकेमधील प्रसिद्ध क्रीडा पत्रकार रेक्स क्लेमेटाइन यांनी दोन ट्विट करत आर्थर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘तेथे काही मूर्ख लोक आहेत ज्यांना वाटते की, त्यांना सर्व काही माहित आहे. पण त्यांना काहीच माहित नाही.’
या निवेदनाद्वारे मिकी आर्थर यांधी त्यांच्या खराब कामगिरीबद्दल श्रीलंकेच्या खेळाडूंवर सातत्याने टीका करणार्यांना लक्ष्य केले आहे.
Mickey Arthur urges his players to stay away from social media. Pretty strong words. ‘There are some idiots out there who think they know everything. But they know nothing.’
— Rex Clementine (@RexClementine) July 24, 2021
रेक्स यांनी दुसऱ्या ट्विटमधून श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे आणि अविष्का फर्नांडो या खेळाडूंवरील आर्थर यांची प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘भानुका आणि अविष्का हे दोन खेळाडू आहेत ज्यांना आमच्या तंदुरुस्ती योजनेचा फटका बसला आणि त्यांना इंग्लंड दौरा चुकवावा लागला. त्यांना चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाला. भानुकाशी माझे मतभेद त्याच्या फायद्यासाठी होते.’
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नव्या करारास अनेक खेळाडूंनी विरोध केला असून, अद्याप कोणत्याही खेळाडूने या करारावर स्वाक्षरी केली नाही.
Mickey Arthur on his fitness regime. ‘Bhanuka and Avishka are two guys who have borne the brunt of our fitness scheme and missed out on tours. Couldn’t have been happier to see them come good. The differences I had with Bhanuka was for his own good.’
— Rex Clementine (@RexClementine) July 24, 2021
आर्थर यांचा कर्णधाराशी झालेला वाद
भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आघाडीवर असताना श्रीलंका संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर चांगलेच संतप्त झाले होते. सामन्यानंतर भर मैदानात आर्थर यांनी श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याच्याशी वाद घातला होता. त्या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला.
महत्त्वाच्या बातम्या-
वारं की अजून काही! फलंदाजाने शॉट मारण्यापुर्वीच स्टंप्सवरील बेल्स पडल्या खाली, पंचही थक्क
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?
‘टीम इंडियाची प्रगती पाहून वाटतंय, आम्ही अजून २ संघ निवडून कोणतीही स्पर्धा जिंकू’