इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर न्यूझीलंडने १-० अशा फरकाने कब्जा केला. एजबॅस्टन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत चौथ्या दिवशीच न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा पराभव केला. या विजयानंतर न्यूझीलंड संघ आत्मविश्वासाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, न्यूझीलंडच्या प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने याच्या अगदी विरुद्ध विधान केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या विजयाचा फायदा नाही
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या मालिकेतील लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. मात्र, ते विजय मिळवू शकले नाहीत. परंतु, तब्बल सहा बदल करूनही एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीत त्यांनी चौथ्या दिवशीच विजय मिळवला.
या विजयाचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने उत्तर दिले की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर या विजयाचा आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी काहीही फायदा नाही. चांगली तयारी प्रत्येकासाठी चांगलीच असते.”
त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतोय
बोल्टने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना म्हटले, “मी या ऐतिहासिक सामन्यासाठी खूप आतुर आहे. मला आशा आहे की आम्ही विजयी लय कायम राखू. आयपीएलमुळे माझे सर्व भारतीय खेळाडूंची चांगले संबंध आहेत. मात्र अशा सामन्यासाठी मैदानात उतरताना थोडीफार नोक झोक होतेच. मी अजून तरी कोणत्याही मुंबईच्या खेळाडूंना भेटलो नाही. मात्र, सामन्यावेळी वातावरण प्रफुल्लित असेल.”
ट्रेंट बोल्ट याने न्यूझीलंडसाठी ७२ सामने खेळले असून, यामध्ये त्याला २८७ बळी घेण्यात यश आले आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही त्याने ६ बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाची चिंता मिटली! ‘या’ कामगिरीत कोहली आहे विलियम्सनपेक्षा सरस
शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, केवळ एका भारतीय खेळाडूला दिले स्थान
WTC फायनलमध्ये कोहलीकडे नामी संधी, ‘हा’ कारनामा करत रिकी पाँटिंगला टाकू शकतो मागे