आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी भीमपराक्रम केले आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनिल कुंबळे (Anil Kumble) सारख्या दिग्गज खेळाडूंनी अनेक मोठे पराक्रम केले आणि इतिहास रचला. परंतू त्यातील काही रेकाॅर्ड्स तुटले देखील. पण असा एक रेकाॅर्ड आहे जो 67 वर्षांपासून कायम आहे आणि आजही कोणताही खेळाडू हा रेकाॅर्ड तोडू शकला नाही. कसोटी क्रिकेटमधील हा रेकाॅर्ड इंग्लंडचा महान गोलंदाज जिम लेकरनं (Jim Laker) 1956 मध्ये केला होता.
जिम लेकरनं (Jim Laker) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात धारदार गोलंगाजी केली होती. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जिम लेकरनं (Jim Laker) 19 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्यानं 37 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या होत्या.
लेकरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 10 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आणि इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी त्याच्यासमोर गुडघे टेकले. तेव्हापासून एका सामन्यात 19 विकेट्स घेण्याचं रेकाॅर्ड त्याच्याच नावावर आहे. जिम लेकर (Jim Laker) 1996 मध्ये मरण पावला, परंतू त्याचा रेकाॅर्ड आजही स्मरणात आहे.
जिम लेकरच्या (Jim Laker) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्ल बोलायचं झालं, तर त्यानं इंग्लंडसाठी 46 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 63 डावात फलंदाजी करताना 676 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 14.08 राहिली. कसोटीमध्ये त्यानं 2 अर्धशतक झळकावले आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 63 राहिली. तर 46 कसोटी सामन्याच्या 86 डावात गोलंदाजी करताना त्यानं 193 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 21.24 राहिली तर इकाॅनाॅमी रेट 2.04 राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताच्या वनडे संघातून ‘या’ 3 खेळाडूंची होऊ शकते कायमची सुट्टी!
पृथ्वी शॉ वेधतोय प्रशिक्षक गंभीरचं लक्ष! वनडे कप स्पर्धेत 44 चौकारांच्या मदतीने केल्यात 294 धावा
IND vs SL: 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघ अडचणीत