जागतिक क्रिकेटमध्ये मिस्टर ३६० अशी ओळख निर्माण केलेला दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डी विलीयर्स कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध सूरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर या प्रकारातुन निवृत्ती घेणार असल्याच बोललं जात आहे.
काल जेव्हा एबी फलंदाजीसाठी मैदानात येत होता तेव्हा समालोचक माईक हाइसमॅन यांनीतो शेवटची मालिका खेळण्यासाठी येत असल्याचे म्हटले होते. याबद्दल सोशल मिडीयावर चाहत्यांनी ट्विट करत नाराजगी व्यक्त केली.
अाफ्रिकेकडून जे ९ खेळाडू १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत त्यात एबी डी विलीयर्सचा समावेश आहे. जॅक कॅलिस (१६५), मार्क बाऊचर (१४६) अाणि माजी कर्णधार स्मिथ (११६) हे एबीपेक्षा आफ्रिकेकडून जास्त कसोटी सामने खेळले आहेत.
३४ वर्षीय एबीही कसोटी सामने खेळण्यासाठी उत्सुक नाही हे त्याने मागे कसोटी मालिकांमधून माघार घेतल्यामुळे दिसुन आले आहे. तरीही संघ हिताला प्राधान्य देत तो कसोटी क्रिकेट खेळत आहे.
१११ कसोटीत त्याने ५०.३५च्या सरासरीने ८४०९ धावा केल्या असून त्यात २१ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.
Mike Haysman during commentary said this could be last series for AB De Villiers…
— Broken Cricket (@BrokenCricket) March 2, 2018
" i am taking it one game at a time, i can't afford to look too far ahead. Loving my cricket, i am loving the environment and hopefully it will continue for a long time " ~ AB
AB is hopeful of prolonging Test Career https://t.co/xkXFAI4rgs— JSK (@imjsk27) March 3, 2018
https://twitter.com/aneeshudhay/status/969813161153998848