आयपीएल २०२२ (IPL 2022) विषयी चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामापूर्वी बीसीसीआयने मेगा लिलावा आयोजित केला आहे. मेगा लिलाव (mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या ५९० खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर केली. मेगा लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागणार आहेत, तर काही युवा खेळाडूंवरही पैशाचा पाऊस पडणार आहे. आपण या लेखात अशाच १० मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत, जे मेगा लिलावात महत्वाचे ठरतील.
- १. यावर्षी मेगा लिलावात ज्या ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे, त्यामध्ये २२८ कॅप्ड आणि ३५५ अनकॅप्ड खेळाडू आहेत. त्याव्यतिरिक्त सात खेळाडू असोसिएटेड देशांमधून आहेत. लिलावात ३७० भारतीय आणि २२० विदेशी खेळाडू सहभागी आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वात जास्त ४७ खेळाडू आहेत. त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे वेस्ट इंडीज (३४) आणि दक्षिण अफ्रिका (३३) यांचा.
- २. मेगा लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी ४८ खेळाडूंची बेस प्राइज दोन कोटी रुपये आहे. तसेच २० खेळाडू असे आहेत, ज्यांची बेस प्राइस दीड कोटी रुपये आहे. एक कोटी बेस प्राइससह ३४ खेळाडू मेगा लिलावात उतरणार आहेत. (बेस प्राइस – खेळाडूंवर या आकड्यापासून पुढे बोली लागणार.)
- ३. मेगा लिलावात अनेक भारतीय दिग्गज सामील होणार आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि इतरही मोठ्या नावांचा सामावेश आहे. यापैकी सर्वात जास्त चर्चेत आहेत ते म्हणजे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर यांच्यासारखे खेळाडू. धवन आणि अय्यर मागच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होते, तर शार्दुल आणि चाहर चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत होते.
- ४. विदेशी खेळाडूंमध्ये डेविड वॉर्नर, फाफ डू प्लेसिस, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, क्विंटन डी कॉक, जॉनी बेयरस्टो आणि जेसन होल्डरसह इतरही मोठ्या नावांचा समावेश आहे. विदेशी खेळाडूंपैकी डेविड वॉर्नरवर फ्रेंचायझींच्या नजरा असतील. वॉर्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे जेतेपद जिंकले होते.
- ५. दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इमरान ताहीर आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी असेल. इमरानचे वय ४२ वर्ष आहे आणि मेगा लिलावात सामील झालेला तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये ड्वेन ब्रावो, एस श्रीसंत, फिडेल एडवर्ड्स यांसारख्या खेळाडूंचीही नावे आहेत.
- ६. अफगाणिस्तानचा नूर अहमद मेगा लिलावात सहभागी झाला आहे. लिलावात सहभागी होणारात अहमद सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. त्याचे वय सध्या १७ वर्ष आहे. अफगाणिस्तान संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील टी-२० विश्वचषक खेळत आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.
- ७. लिलावात भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे खेळाडूही खूप पैसा कमवतील. सध्या ते वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक खेळत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार यश धूल, विक्की ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर हे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसले आहेत आणि मेगा लिलावातही त्यांचा सहभाग आहे. मेगा लिलावात हे भारतीय युवा काय कमाल करतात हे पाहण्यासारखे असेल. त्याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल, शाहरुख खान, दीपक हुड्डा आणि आवेश खान यांसारख्या युवा खेळाडूंचाही लिलावात सहभाग आहे.
- ८. क्रिस गेल, एबी डिविलियर्स, बेन स्टोक्स यांसारखे विदेशी दिग्गज यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. क्रिस गेल आणि बेन स्टोक्सने यावर्षी आयपीएल लिलावात स्वतःचे नाव नोंदवले नाहीय, तर डिविलियर्सने मागच्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे.
- ९. आयपीएलमधील १० संघानी पुढच्या हंगामासाठी एकून ३३ खेळाडूंना संघात रिटेन केले आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांनी ६ खेळाडूंना रिटने केले, तर आठ जुन्या संघांनी २७ खेळाडूंना रिटेन केले. रिटेने केल्या गेलेल्या ३३ खेळाडूंमध्ये केएल राहुल सर्वात महागडा ठरला. राहुलसाठी लखनऊ फ्रेंचायजीने १७ कोटी रुपये मोजले.
- १०. पुढच्या हंगासाठी संघात खेळाडूंना रिटेन करून मेगा लिलावासाठी सर्वाधिक रक्कम शिल्लक असेलेल्या संघांमध्ये पंजाब किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्जकडे अजून ७२ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशात मेगा लिलावात पंजाब संघ तुफान पैसा खर्च करताना दिसेल. या यादीत पंजाब पाठोपाठ सनरायझर्स हैदराबाद (६८ करोड) आणि राजस्थान रॉयल्सचा नंबर येतो. दिल्ली कॅपिट्लकडे सर्वात कमी ४२.५० करोड रुपये शिल्लक आहेत.
महत्वाच्या बातम्या –
टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा
चालू वर्षी पुन्हा रंगणार ‘भारत-पाक क्रिकेटसंग्राम’; केव्हा? कोठे? घ्या जाणून