आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा येत्या १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचे पात्रता फेरीतील सामने ओमानमध्ये खेळले जाणार आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ २००७ मध्ये झाला होता. स्पर्धेच्या पहिल्या पर्वात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर भारतीय संघाला एकही टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही.
मात्र यंदा भारतीय संघाकडे उत्तम संधी असणार आहे. कारण भारतीय संघातील खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. तसेच या संघात अशा दोन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, ज्यांनी २००७ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चला तर पाहुया कोण आहेत ते खेळाडू? (These 2 players who played T20 world cup 2007 can get a chance to play in upcoming T-20 world cup 2021)
रोहित शर्मा
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धेत मोलाचे योगदान दिले होते. त्याला या स्पर्धेत ४ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामधे त्याने ८८ धावा केल्या होत्या. मुख्य बाब म्हणजे तो संपूर्ण स्पर्धेत एकदाही बाद झाला नव्हता. त्यावेळी तो मध्यक्रमात फलंदाजी करायचा. आगामी २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाला जोरदार सुरुवात करून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. जर भारतीय संघाला २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर रोहित शर्माने भक्कम सुरुवात करून देणे आवश्यक असणार आहे.
दिनेश कार्तिक
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान मिळाले नाही. परंतु त्याने अजूनपर्यंत निवृत्ती जाहीर केली नाही. त्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याने भारतीय संघासाठी ३२ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला ३३.२५ च्या सरासरीने ३९९ धावा करण्यात यश आले आहे.
दिनेश कार्तिकने एमएस धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु धोनीचे आगमन झाल्यानंतर कार्तिकला खेळायची खूप कमी संधी मिळाली. त्यामुळे त्याचे संघात येणे जाणे सुरू होते. तसेच २००७ टी-२० विश्वचषक विजेत्या संघात दिनेश कार्तिकचाही समावेश होता. त्यामुळे अनुभवी दिनेश कार्तिकला आगामी २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
गंभीर दुखापतीमुळे शुबमन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ क्रिकेटरला मिळणार तिकीट!
दोन दशकांपूर्वी रॉबिन सिंगने केलेला ‘हा’ विक्रम अजूनही अबाधित, आता भुवीकडे पराक्रम करण्याची संधी