आयपीएलच्या १३ व्या सत्रात बीसीसीआयने बनवलेल्या “मिड सीजन ट्रान्सफर” नियमानुसार खेळाडूंना एका संघातून दुसर्या संघात जाण्याची मुभा दिली आहे. हा नियम ७ सामने खेळल्यानंतर लागू होईल. पण आयपीएलच्या फ्रँचायझी फक्त त्या खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात ज्यांनी आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळलेला नाही, किंवा दोन आणि त्याहून कमी सामने खेळले आहेत.
या लेखात आपण धोनीच्या संघाबद्दल चर्चा करू. चेन्नई सुपर किंग्ज संघ पुढील तीन खेळाडूंना या “मिड सीजन ट्रान्सफर” नियमानुसार आपल्या संघात घेऊ शकतात.
विराट सिंग – सनरायझर्स हैदराबाद
यंदाच्या आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने १.९ कोटी रूपये देऊन स्टार क्रिकेटर विराट सिंगला आपल्या संघात सामील करून घेतले होते. या हंगामातील “मिड सीजन ट्रान्सफर” च्या माध्यमातून हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल होऊ शकतो, यापूर्वी विराट सिंगने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती, त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या संघात घेतले, परंतु आतापर्यंत त्याने संघासाठी एकही सामना खेळता आला नाही.
सनरायझर्स हैदराबादमधील उपलब्ध पर्यायांच्या दृष्टीकोनातून विराट सिंगला संधी मिळणेही अवघड आहे. तर चेन्नई सुपर किंग्जला सध्या मधल्या फळीतील फलंदाजाची गरज आहे. चेन्नईच्या संघासाठी संकटमोचक भूमिका साकारणारा रैना या हंगामात सहभागी न झाल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे ते विराट सिंगला संघात सामील करू शकतात.
पार्थिव पटेल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेललाही या हंगामात आतापर्यंत ११ जणांच्या संघात संधी मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे, देवदत्त पद्धिकल आरसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर आणि अॅरोन फिंचच्या उपस्थितीत, पार्थिव पटेलला आरसीबीच्या अंतिम ११ मध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे.
त्यातच चेन्नई सुपर किंग्जला सध्या संघाला अधिक चांगली कामगिरी करणारा सलामीवीर आवश्यक आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ पार्थिव पटेलला “मिड सीजन ट्रान्सफर” च्या माध्यमातून आपल्या संघात सामील करू शकतो. आयपीएलच्या शेवटच्या २ हंगामात पार्थिव पटेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून शानदार प्रदर्शन केले होते. पार्थिव पटेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २२.६ च्या सरासरीने २८४८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १३ अर्धशतकेही झळकावली आहेत. तसेच त्याने याआधी चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्वही केले आहे.
ललित यादव – दिल्ली कॅपिटल
आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा स्टार क्रिकेटर ललित यादवदेखील त्याच्या संधीची वाट पाहत आहे. ललित यादवला लिलाव दरम्यान २० लाखात दिल्ली कॅपिटसलने आपल्या संघाचा भाग बनविला होता. आता आयपीएलच्या या हंगामात त्याला “मिड सीजन ट्रान्सफर” च्या माध्यमातून चेन्नई संघात जाण्याची संधी देखील मिळू शकते. ललित हा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असून तो चांगली फलंदाजीही करु शकतो.