प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येत असतो. मात्र, हा काळ कधी ना कधी संपतोही. असेच काहीसे जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या तीन खेळाडूंसोबत घडले होते. त्यांनी तब्बल 1000 पेक्षाही जास्त दिवस उलटल्यानंतर शतक झळकावले. यामध्ये दोन भारतीय, तर एका ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश आहे. कोण आहेत ते तीन खेळाडू चला जाणून घेऊया…
बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. मात्र, दुसऱ्या डावात एका नाही, तर दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यापैकीच एक चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा होय. पुजाराने दुसऱ्या डावादरम्यान 130 चेंडूत 102 धावा करत आपले शतक झळकावले. विशेष म्हणजे, तब्बल 1443 दिवस उलटल्यानंतर त्याला हे शतक करण्यात यश आले. पुजारापूर्वी असे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी 1000 पेक्षा अधिक दिवस उटल्यानंतर शतक झळकावले.
He missed out on the three figure mark in the first innings, but gets there in style in the second innings.
A brilliant CENTURY by @cheteshwar1 off 130 deliveries.
Scorecard – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/ITmYuDpYIp
— BCCI (@BCCI) December 16, 2022
विराट कोहली
पुजाराआधी सर्वप्रथम भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. त्याला काही केल्या शतक करता येत नव्हते. तो 70 शतकांवर अडकला होता. मात्र, त्यानंतर त्याने आशिया चषक 2022मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टी20तील पहिले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71वे शतक झळकावले. हे शतक करण्यासाठी विराटला तब्बल 1021 दिवस लागले. यानंतर विराटने बांगलादेश दौऱ्यावर तिसऱ्या वनडेतही शतक साकारत 72वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. तसेच, रिकी पाँटिंग (71 शतके) याचा विक्रमही मोडीत काढला.
डेविड वॉर्नर
विराटनंतर शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 1000 हून अधिक दिवस घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (David Warner) याचा समावेश होतो. वॉर्नरने नोव्हेंबर 2022मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडेत शतकी खेळी साकारली. त्याने तब्बल 1043 दिवसांनंतर शतक पूर्ण केले होते.
अशाप्रकारे या तिन्ही खेळाडूंना शतक ठोकण्यासाठी तब्बल 1000 हून अधिक दिवस लागले. (these 3 cricketers smashed century after 1000 plus days 2 indians in the list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या वाघाची गर्जना! शुबमनने बांगलादेशविरुद्ध झळकावलं पहिलं वहिलं शतक, षटकार- चौकारांचा पाडला पाऊस
आता काय म्हणायचं यांना! पाकिस्तानी खेळाडूचे आयपीएलबाबत खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘आयपीएलची गुणवत्ता…’