काल (११ जून) केरळच्या माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जयमोहन थम्पी यांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला. मागील आठवड्यात थम्पी हे त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळून आले होते. थम्पी यांचा मुलगा अश्विन याने नशेच्या अवस्थेत त्याच्या वडीलांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने क्रिकेटजगताला मोठा धक्का पोहोचला आहे.
पण, क्रिकेट क्षेत्रात हे नवे प्रकरण नाही. यापुर्वी केवळ देशातंर्गत स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अनेक खेळाडूंचा मर्डर झालेला आहे. काही घटना तर अशा आहेत, ज्या आजही रहस्यमयी आहेत. म्हणजे, हाय प्रोफाइल घटना ज्यामध्ये कधीही स्पष्ट झाले नाही की खेळाडूचा नैसर्गिक मृत्यू झाला का त्यांची हत्या केली गेली होती. अशा रहस्यमयी मृत्यू प्रकरणात एका भारतीय खेळाडूच्या मृत्यूप्रकरणाचाही समावेश आहे.
चला तर जाणून घेऊया, त्या खेळाडूंविषयी ज्यांच्या मृत्यूचे धागे नेहमी गुंतलेलेच राहिले आणि शेवटी त्यांच्या मृत्यूला हत्या असल्याचे म्हटले गेले- These 4 Cricketers Death Is Still A Mystery
१. बॉब वूल्मर (इंग्लंड)
इंग्लंडकडून १९ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळणाऱ्या माजी क्रिकेटपटू बॉब वूल्मर यांचा मृतदेह २००७सालच्या विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या हॉटेलमध्ये सापडला होता. या गोष्टीने संपूर्ण क्रिकेट क्षेत्र हादरले होते. त्यावेळी वूल्मर हे पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक होते. तपासणीदरम्यान सुरुवातीला असे समोर आले की, वूल्मर यांना घसा दाबून मारण्यात आले. परंतु, नंतर सांगितले गेले की, वूल्मर यांना घसा दाबून मारले गेले नव्हते, त्यांना नैसर्गिक मृत्यू आला होता. म्हणजे, सत्य उघडकीस आले नाही आणि शेवटी वूल्मर यांच्या मृत्यूला हत्येचे रुप देण्यात आले.
२. राजेश पीटर (भारत)
राजेश पीटर यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, त्यांना खूप प्रतिभाशाली खेळाडू समजले जात होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून १३ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. १६ नोव्हेंबर १९५९ला राजेश यांच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह रहस्यमयी अवस्थेत सापडला होता. अनेक पुराव्यांनंतरही त्यांच्या केसचा अंतिम निर्णय लागला नाही. पण, असे म्हटले जाते की राजेश यांची हत्या केली गेली होती.
३. पर्सी हार्डी (इंग्लंड)
इंग्लंडच्या सोमरसेट संघाकडून १०० प्रथम श्रेणी सामने खेळणारा पर्सी हार्डी हा ९ मार्च १९१६ला लंडनच्या किंग्स क्रॉस स्टेशनवर मृत अवस्थेत आढळला होता. त्याचा गळा कापलेला होता आणि बाजूला रक्ताने माखलेला चाकू पडलेला होता. सोमरसेट कांउटी संघाने हार्डीच्या मृत्यूला आत्महत्या असल्याची नोंद केेली आहे. परंतु, या क्रिकेटपटूच्या मृत्यू अजूनही एक रहस्य म्हणून राहिला आहे.
४. टर्टिअस बॉच (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकाकडून २ कसोटी आणि एक वनडे सामने खेळणाऱ्या टर्टिअस बॉच याचा १४ फेब्रुवारी २०००ला गिलैन बेअर सिंड्रोम या आजारामुळे मृत्यू झाला होता. परंतु, पोस्टमार्टमच्या अहवालात दिले गेले होते की, त्याचा विष दिल्यामुळे मृत्यू झाला होता. पण, नंतर टर्टिअसच्या केसला बंद केले गेले आणि प्रकरणाचा तपासही केला गेला नाही. त्यामुळे टर्टिअस यांचा मृत्यू देखील एक रहस्यच राहिला.
ट्रेंडिंग लेख-
केवळ ४० मिनीटांत झाले होते वनडेमधील हे हटके शतक, मोडले होते शेकडो…
टीम इंडियाने १ किंवा २ गडी राखून मिळवलेले रोमांचकारी कसोटी विजय
वनडेत शंभरपेक्षा जास्त वेळा ५० प्लस धावा करणारे जगातील ५ महारथी