---Advertisement---

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 7:04 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेक महान क्रिकेटपटू झाले. अगदी त्यातील काही क्रिकेटपटूंनी देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील चाहत्यांना आपलेसे केले आहे. असे खेळाडू आहेत जे एका देशात जन्मले आणि दुसर्‍या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भारतातीलही असे अनेक खेळाडू जन्मले आहेत जे इतर देशांमधून खेळताना दिसतात. परंतु असे काही भारतीय खेळाडू आहेत जे विदेशात जन्मले आणि ते भारताकडून खेळले आहेत.

या लेखात भारतातील अशाच ४ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. हे चारही खेळाडू परदेशी भूमीवर जन्मले होते, परंतु त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी भारताची निवड केली. चला तर मग त्या ४ खेळाडूंवर एक नजर टाकूया….

सलीम दुरानी (Salim Durani)

भारतीय क्रिकेट इतिहासात असे काही खेळाडू आहेत ज्यांचा जन्म परदेशात झाला होता. त्यातील एक नाव म्हणजे सलीम दुरानी यांचे आहे. माजी क्रिकेटपटू सलीम दुरानी यांनी जवळपास १४ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले.

सलीम दुरानी त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानाची राजधानी काबुल येथे झाला होता. पण त्यानंतर त्यांचे पालन-पोषण गुजरातमधील जामनगरमध्ये झाला. येथूनच त्यांनी क्रिकेट शिकले. प्रथम त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळेल आणि नंतर १९६० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतासाठी पदार्पण केले. त्या सामन्यात त्यांनी १८ धावांची खेळी केली. तो सामना अनिर्णित राहिला.

प्रथम श्रेणीचे १७० सामने ते खेळले त्यात ८५४५ धावा केल्या तर २९ कसोटी सामन्यात १२०२ धावा केल्या आणि गोलंदाजीत ७५ बळी देखील घेतले. सलीम दुरानी १९७३ पर्यंत भारताकडून खेळले. शेवटचा सामना ते इंग्लंड विरुद्ध मुंबई येथे खेळले. त्यात पहिल्या डावात ७३ तर दुसऱ्या डावात ३७ धावा केल्या. हा सामना देखील अनिर्णित राहिला.

रॉबिन सिंग (Robin Singh)

भारतासाठी काही सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू खेळले आहेत, ज्यात रॉबिन सिंग या खेळाडूचा समावेश आहे. भारताचा माजी अष्टपैलू रॉबिन सिंगने बरीच वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. खरतर रॉबिन सिंग याचा जन्म भारतात झाला नाही. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद, कॅरिबियन येथे झाला होता.

त्यानंतर रॉबिन सिंग भारतात आला. विशेष म्हणजे त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेमधून पदार्पण केले. त्याने एकूण १३६ वनडे सामने खेळले असून त्यात २३३६ धावा केल्या आहेत तर ६९ बळी देखील मिळवले आहेत.
तर त्याने भारतासाठी फक्त १ कसोटी १९९८ मध्ये खेळला.

त्याने २००१ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळाला आणि २००४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर रॉबिन सिंगने भारतीय संघाव्यतिरिक्त देशातील देशांतर्गत संघात प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. तो भारतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो.

लाल सिंग (Lal Singh)

लाल सिंगा विषयी सांगायचे झाले तर त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९०९ रोजी भारतात नव्हे तर मलेशियात झाला. ते भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहभागी होते. तो सामना त्यांनी १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. भारताकडून खेळल्यानंतर ते पुन्हा मलेशियात स्थायिक झाला. १९८५ रोजी मलेशियात त्यांचे निधन झाले. लाल सिंग भारतासाठी मोठी कारकीर्द करू शकले नाही, परंतु तरीही त्यांना विशेष मान दिला जातो.

अशोक गंडोत्रा (Ashok Gandotra)

माजी क्रिकेटपटू अशोक गंडोत्रा ​​हे परदेशी भूमीवर जन्मलेल्या खेळाडूंपैकी एक आहेत. अशोक गंडोत्रा ​​देखील भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत आणि ते देशांतर्गत क्रिकेट देखील खेळले होते. या माजी भारतीय खेळाडूचा जन्म ब्राझीलमध्ये २४ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता.

त्यांनी ५४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून २१२१ धावा केल्या आणि सोबतच २१ बळी देखील घेतले. त्यांनी ऑक्टोबर १९६९ मध्ये भारताकडून पहिला कसोटी सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला. ते देशांतर्गत क्रिकेट बंगाल आणि दिल्लीकडून खेळले. त्यांनी भारताकडून फक्त २ कसोटी सामने खेळले. त्यांनी पदार्पणाच्याच वर्षात नोव्हेंबर १९६९ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---