कोरोना महामारीमुळे क्रिकेटसुद्धा थांबले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मालिका आणि स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी खेळली जाणारी टी२० विश्वचषक स्पर्धा देखील रद्द करण्यात आली, तर त्याचवेळी आयपीएल मार्च ते मे दरम्यान सुरु होणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे ही स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी युएईमध्ये सुरु झाली.
टी२० विश्वचषक रद्द झाला असला तरी आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू झाला आहे, पण टी२० विश्वचषकाचा विचार केला, तर या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंवर विशेष नजर असेल. या हंगामात प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात, असे अनेक खेळाडू असतील जे उत्तम प्रदर्शन करून भारताच्या टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी तयार असतील. भारताच्या त्या ५ गोलंदाजांबद्दल या लेखात जाणून घेऊया.
भारताच्या या ५ गोलंदाजांना आयपीएल १३ मध्ये चांगले प्रदर्शन करून भारतीय टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवायचे आहे- these 5 bowlers of india will prove for t20 world cup
नवदीप सैनी
भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही वर्षांत चांगले युवा वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. यातून दिल्लीचा युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपली क्षमता दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. नवदीप सैनीने आपली प्रतिभा दाखवून भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता तो येत्या काही वर्षांत भारतासाठी नियमित खेळताना दिसू शकतो.
नवदीप सैनी हा आरसीबीकडून खेळत आहे. यंदा तो त्याच्या गोलंदाजीने आरसीबी संघाचे आयपीएल विजेतेपदाची स्वप्न पूर्ण करू शकतो. त्याच्या आयपीएलमधील चांगल्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
या हंगामात त्याने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यात २ बळी मिळवले आहेत. कालच पार पडलेल्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवदीप सैनी पुढील वर्षीच्या टी२० विश्वचकासाठी भारतीय संघात आपले स्थान बळकट करू इच्छित आहे.
शार्दुल ठाकूर
भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाजांसाठी गेली काही वर्षे उत्तम मिळत आहेत. वेगवान गोलंदाज असो वा फिरकी गोलंदाज, भारताच्या संघात अनेक नवीन चेहरे दिसू लागले आहेत. शार्दुल ठाकूर हा त्यातील एक चांगला गोलंदाज आहे.
शार्दुल ठाकूरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये किंवा आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली आहे. याच जोरावर शार्दुल ठाकूरने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केले. तो भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमित खेळत आहे. त्याला भारताकडून अनेक टी२० सामने खेळण्याची संधीही मिळाली आहे. या स्पर्धात्मक सामन्यात शार्दुलला यावेळी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू आहे, तो यंदा उत्तम प्रदर्शन करून भारताच्या टी२० विश्वचषक संघात स्थान मिळविण्याच्या विचारात आहे. परंतु त्याला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
दीपक चाहर
आयपीएलने गेल्या काही वर्षात सर्वोत्तम युवा वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेट संघाला दिले आहेत. यातील एक वेगवान गोलंदाज म्हणजे दीपक चाहर. दीपक चाहरनेही भारतीय संघाकडून खेळताना चांगली सुरुवात केली असून तो संघातील एक चांगला गोलंदाज होऊ शकतो. आयपीएलमधूनच दीपक चाहरला भारतीय संघात स्थान मिळालं. तसे, तो भारताकडून खेळत असताना जखमी झाला होता. टी२० मधील उत्तम गोलंदाज म्हणून त्याने आपली छाप सोडली आहे. पण आता दुखापतीनंतर त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले.
दीपक चहर चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन तो भारताच्या टी२० संघात परत येऊ शकेल आणि विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड होईल. या हंगामात त्याने ३ सामन्यात ३ बळी मिळवले आहेत.
मोहम्मद शमी
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता शानदार प्रदर्शन करत आहे. गेल्या वर्षीपर्यंत मोहम्मद शमीला भारताचा कसोटी गोलंदाज म्हणून ठेवले होते. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळताच त्याने पुन्हा स्वत: ला सिद्ध केले आहे. मोहम्मद शमीने भारताकडून वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
शमी आता टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या तयारीत असेल. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून तो चांगली कामगिरी करत आहे. पंजाब संघाचा प्रमुख गोलंदाज देखील शमीच आहे. या हंगामात तो आपल्या गोलंदाजीचा जादू दाखवत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ३ सामन्यात ७ बळी मिळवले आहेत.
वॉशिंग्टन सुंदर
भारतीय क्रिकेट संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. या फिरकी गोलंदाजांमध्ये काही युवा फिरकी गोलंदाजांनी भारताच्या संघात स्थान मिळवले आहे. विशेषत: टी२० मधील युवा फिरकी गोलंदाजांपैकी वॉशिंग्टन सुंदरनेही सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या फिरकी गोलंदाजीने धावा रोखण्यात मोठे यश मिळवले.
त्याने आतापर्यंत भारतासाठी अनेक टी२० सामने खेळले आहेत. तसे, त्याला राहुल चहर आणि कृणाल पंड्या सारख्या खेळाडूंकडून आव्हान असेल. अशा परिस्थितीत सुंदरला या आयपीएल हंगामात आरसीबीकडून खेळताना गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टींनी आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत या हंगामात त्याने ३ सामन्यात फलंदाजीत ३० धावा केल्या आणि गोलंदाजीत १ बळी मिळवला आहे.






