---Advertisement---

‘ही’ परदेशी टी२० स्पर्धा गाजवण्यास भारतीय महिला क्रिकेटपटू सज्ज, स्म्रीतीचाही समावेश

On: शुक्रवार, जून 11, 2021 11:12 AM
---Advertisement---

सध्याचे क्रिकेट युग हे टी-२० चे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कमी वेळेत दर्शकांचे जास्त मनोरंजन होते. त्यामुळे अनेक क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी व्यावसायिक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरु केले आहे. यामध्ये भारताची इंडिअन प्रिमिअर लीग (आईपीएल) सर्वात मोठी फ्रँचाइजी टी२० स्पर्धा स्पर्धा मानली जाते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग, पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीग, वेस्ट इंडीजची कॅरेबियन प्रीमियर लीग आणि अशा बऱ्याच फ्रँचाइजी स्पर्धा इतर देशात भरवल्या जातात.

लवकरच इंग्लंडतर्फे आयोजित अशीच एक टी-२० स्पर्धा, ‘द हंड्रेड’चा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत काही भारतीय महिला क्रिकेटपटूसुद्धा भाग घेणार आहेत.

‘द हंड्रेड’ स्पर्धेत ५ भारतीय महिला क्रिकेटपटू भाग घेत असून हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधानासारखे वरिष्ठ खेळाडू आणि तसेच टी-२०ची अव्वल क्रिकेटपटू क्रिकेटर शेफाली वर्मा, अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिग्स इत्यादी महिलांचा यात समावेश आहे.

भारतीय महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत ‘मॅनचेस्टर ओरिजिनल’ संघाचे प्रतिनिधित्व करेल. स्म्रिती ‘साउदर्न ब्रेव’, दीप्ती ‘लंडन स्पिरीट’, जेमिमा ‘नॉर्दन सुपरचार्जर्स’ आणि शेफाली ‘बर्मिंघम फीनिक्स’ संघातून खेळतील. न्यूझीलंड महिला संघाची अष्टपैलू खेळाडू सोफी डीवाइन काही वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

द हंड्रेड महिला स्पर्धेची प्रमुख बेथ बरेट वाइल्ड यांनी सांगितले कि, “ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळा (ईसीबी)ची आजवरील सर्वात महत्वपूर्ण स्पर्धा आहे. यामध्ये भारतीय स्टार महिला क्रिकेटपटूंना सहभागी होऊ दिल्यामुळे आम्ही खुश झालो आहोत. भारतीय महिला खेळाडूंमुळे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यांमुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्याप्रकारे पार पडेल. मी २१ जुलै आणि त्यानंतर होणाऱ्या पूर्ण स्पर्धेची वाट पाहत असून या स्पर्धेत विश्वस्तरीय खेळाडूंना प्रदर्शन करताना पाहायला आनंद होईल.”

हरमनप्रीतने सांगितले कि, “मला द हंड्रेड महिला स्पर्धेचा पहिला हंगाम खेळता येणार आहे. तसेच मोठ्या मैदनावर खासकरून आमच्या महिलांमध्ये या सर्व घटनेचा इतिहास बनताना मला आनंद होईल. आम्ही भारतात खूप प्रेक्षकांसमोर खेळलो आहे आणि आम्हाला याचा अनुभव आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

कोहली-डिविलियर्सप्रमाणे त्यांच्या लाडक्या लेकींमध्येही मैत्री, ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असंच

श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी खेळाडूंसह प्रशिक्षकांना ‘ही’ गोष्ट करणे बंधनकारक, वाचा सविस्तर

अथियाच्या इंस्टाग्राम पोस्टने चर्चेला उधाण; नेटकरी म्हणाले, ‘राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहेस?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---