आयपीएल स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी 2020 आयपीएल स्पर्धा फार यशस्वी ठरली नाही. इतिहासात पहिल्यांदाच संघ टॉप 4 मध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरला. अशावेळी आयपीएल 2021 मध्ये संघात काही मोठे बदल होऊ शकतात. या लेखात आपण बघणार आहोत असे 5 खेळाडू, जे कदाचित 2021मध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार नाहीत.
1. सुरेश रैना
एमएस धोनीचा खास मित्र व भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैना हा कदाचित आयपीएल 2021 मध्ये चेन्नईकडून खेळताना दिसणार नाही. आयपीएल स्पर्धेच्या 2008 मधील पहिल्या सत्रापासून सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आहे. 2016 व 2017 साली चेन्नई संघाला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. 2016- 17 साली तो गुजरात संघाकडून खेळला होता. मात्र, 2018 मध्ये चेन्नईच्या पुनरागमनावर झाल्यावर पुन्हा एकदा तो चेन्नईकडून खेळला होता. आयपीएल 2021 मध्ये वैयक्तिक कारणास्तव त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.
2. हरभजन सिंग
भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंग हा 2018- 19 साली चेन्नई संघाकडून खेळला होता. 2018 मध्ये चेन्नईच्या विजेतेपदावर नाव करण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. रैना प्रमाणेच हरभजन देखील वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020 स्पर्धेतून बाहेर झाला होता.
3. ड्वेन ब्राव्हो
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हा 2011 सालापासून चेन्नई संघात खेळतो आहे. 2016- 17 साली चेन्नई संघाला स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यावर तो गुजरात संघाकडून खेळला होता. 2018 मध्ये पुन्हा तो चेन्नई संघाकडून खेळला होता. दुखापतीमुळे 2020 आयपीएलमध्ये तो पूर्ण सामने खेळला नाही. आयपीएल 2021 मध्ये तो चेन्नईकडून खेळण्याची शक्यता कमीच आहे.
4. केदार जाधव
आयपीएल 2018 स्पर्धेच्या वेळी केदार जाधव हा चेन्नई संघाचा सर्वाधिक महागडा खेळाडू होता. 2018 साली दुखापतीमुळे तो केवळ एकच सामना खेळू शकला. आयपीएल 2019 मध्ये देखील त्याला दुखपात झाली व तो शेवटचे सामने खेळू शकला नाही. 2020 स्पर्धेमध्ये तो जवळपास सर्व सामने खेळला. मात्र, त्याला जास्त उत्तम कामगिरी करता आली नाही. केदार आयपीएल 2021 सर्धेत चेन्नई संघाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.
5. शेन वॉटसन
शेन वॉटसन हा 2018, 2019 व 2020 साली चेन्नई संघाकडून खेळला होता. 2018 अंतिम सामन्यात त्याची खेळी आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. वॉटसनने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संधी असूनही फायदा घेता येणार नाही, टीम इंडियाचे पुनरागमन अशक्य’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा