आयपीएल 2021 च्या सत्रात प्रत्येक दिवशी एक नवीन खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहे. त्यामध्ये अनुभवी खेळांडूंपेक्षा सध्या नवख्या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याची दिसत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्व संघांनी आपला संघ मजबूत करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. परंतु त्यामध्ये काही खेळाडू त्यांच्या 20 लाख रूपयांच्या मूलभूत किंमतीवर विकले गेले आहेत. परंतु त्यांनी यंदाच्या आयपीएल मोसमातील चमकदार कामगिरी केली आहे. तर अशा पाच खेळाडूबद्दल आपण जाणून घेऊया.
हर्षल पटेल : यामध्ये पहिले नाव आहे हर्षल पटेल. हर्षल पटेल हा मागच्या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघात होता. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 20 लाख रूपयांत विकत घेतले होते. परंतु यावर्षी रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड करून त्याला आपल्या संघात सामील केले. आरसीबी संघामध्ये सामील झाल्यापासून त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने यंदाच्या आयपीएल हंगामात 5 सामने खेळले असून यामध्ये त्याने 15 बळी घेतले आहेत. तर या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स सारख्या बलाढ्य संघाविरूद्ध त्याने 5 बळी मिळवले आहेत.
देवदत्त पडीक्कल : या यादीत दुसरा खेळाडू आहे देवदत्त पड्डीकल. या खेळाडूलाही मागील मोसमात आरसाबीने 20 लाख रूपयांत खरेदी केले होते. मागील हंगामात त्याने 15 सामन्यांत 475 धावा केल्या होत्या तर यंदाच्या सत्रातही तो धावांचा पाऊस पाडत आहे. या सत्रात त्याने चार सामने खेळले असून एका शतकासह 171 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे ब्रायन लारा सुनिल गावसकर यांसारख्या माजी दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे.
शहबाज अहमद : यानंतर या यादीत येतो तो म्हणजे आरसीबी संघातील शहबाज अहमद. शहबाज अहमदचे आयपीएल 2021 मधील आत्तापर्यतचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. मागील हंगामात तो फक्त दोन सामने खेळला होता. परंतु यंदाच्या मोसमात या अष्टपैलू खेळाडूला संधी मिळाल्यापासून त्याने फलंदाजीमध्ये काही खास केले नाही. परंतु गोलंदाजीमध्ये त्याने चार सामन्यांत तीन बळी घेतले आहेत.
आर्शदीप सिंग : अर्शदीप सिंगला पंजाब संघाने आयपीएल 2019 च्या मोसमात 20 लाख रूपयांत विकत घेतले होते. त्यानंतर 2020 च्या आयपीएल मोसमात त्याने 8 सामने खेळले होते आणि 9 बळी घेतले होते. त्यानंतर आयपीएल 2021 मध्ये त्याने आत्तापर्यत पाच सामने खेळले असून यामध्ये त्याने 6 बळी घेतले आहेत.
मार्को जान्सेन : या यादीत आणखी एक नाव असून तो खेळाडू आहे मुंबई इंडियन्स संघातील मार्को जान्सेनचे. कोणत्याही खेळाडूला मुंबई इंडियन्स संघात सहजासहजी स्थान मिळत नाही. परंतु आयपीएलच्या 14 व्या सत्रात मुंबईने मार्को जानसेनला 20 लाख रूपयांच्या मूलभूत किंमतीवर खरेदी केली. त्याने आत्तापर्यत दोन सामने खेळले असून यामध्ये त्याने दोन बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्स मागील दुष्टचक्र संपेना! ‘या’ परदेशी खेळाडूनेही घेतली आयपीएल २०२१ मधून माघार
ब्रेकिंग! दिल्ली कॅपिटल्सच्या आर अश्विनने घेतली आयपीएल २०२१ हंगामातून विश्रांती; ‘हे’ आहे कारण
आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी