टी20 विश्वचषक 2022 या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न या ठिकाणी खेळला गेला. टी20 विश्वचषकाच्या आठव्या हंगामात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत जेतेपद पटकावले. विश्वचषकाच्या या हंगामात अनेक गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
5. एन्रीच नॉर्किया
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरूवातीला दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाला उपाांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. या संघासाठी एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) याने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले. विश्वचषकात खेळलेल्या 5 सामन्यात त्याने 5.37 च्या इकॉनमीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकात खेळलेल्या 5 सामन्यात त्याने फक्त 94 धावा दिलेल्या.
4. ब्लेसिंग मुजरबानी
झिम्बाब्वे संघाने या टी 20 विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करत एक मोठा उलटफेर केला होता. याच झिम्बाब्वे संघाच्या एका गोलंदाजाने विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या संघाच्या ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani) याने विश्वचषकात खेळलेल्या 8 सामन्यात 11 गडी बाद केलेले. त्याने विश्वचषकात टाकलेल्या 26 षटकात 7.65च्या इकॉनमीने 188 धावा दिलेल्या.
3. बास डी लीडे
नेदरलँड्स संघाने देखील या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत एक मोठा उलटफेर केलेला. या सामन्यात बास डी लीडे (Bas De Leede) याने 2 फलंदाज बाद केलेले. विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत या गोलंदाजाने तिसरे स्थान प्राप्त केले आहे. त्याने विश्वचषकात खेळलेल्या 8 सामन्यात 7.68च्या इकॉनमीने 13 गडी बाद केले.
2. सॅम करन
नुकताच इंग्लंड संघाने 2022च्या टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या विश्वचषकात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curran) याने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्याने 3 गडी बाद करत संघाला विजयाजवळ नेण्यात मदत केली. सॅमने टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेेेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. विश्वचषकात खेळलेल्या 6 सामन्यात त्याने 6.52च्या इकॉनमी रेटने 13 गडी बाद केलेे.
1. धनंजय डी सिल्वा
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू धनंजय डी सिल्वा (Dhananjay De Silva) याने विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने विश्वचषकात खेळलेल्या 8 सामन्यात 6.41 च्या इकॉनमी रेटनेे सर्वाधिक 15 विकेट्स घेतल्या. या विश्वचषकात श्रीलंका संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरेलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके
सेमीफायलमधून बाहेर पडूनही भारत ‘या’ यादीत दुसऱ्या स्थानी, इंग्लंडने ट्रॉफी जिंकून पटकावला तिसरा क्रमांक